राणा खून प्रकरण ; चार वर्षानंतर दोघं पोलिस कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल

राणा खून प्रकरण ; चार वर्षानंतर दोघं पोलिस कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल

धुळे - प्रतिनिधी dhule

येथील महेश राणा (Murder) खून प्रकरणी चार वर्षानंतर (Court) न्यायालयाच्या आदेशाने दोघा पोलिस कर्मचार्‍यांवर आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत भारती महेश राणा (वय 40 रा. गल्ली नं. 5 व 6 ची बोळ, माधवपूरा, धुळे) यांच्या फिर्यादीनुसार, आझादनगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस कॉन्टेबल महेश मोरे व संजय भोई यांनी मयत महेश राणा याच्या घरी जावुन त्याला तु भांग विक्रीचा व्यवसाय करतो, आम्हाला हप्ता दे, असे बोलून पैशांची मागणी केली. तेव्हा मयताने पैसे देण्यास नकार दिला. त्याचा राग येवून दोघांनी राणा यास हाताबुक्यांनी व छातीवर, पोटावर, पाठीवर मारहाण केली. त्यात ते खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना दि.28 जुलै 2018 रोजी दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली होती.

याबाबत भारती मोरे यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार दोघा पोलिस कर्मचार्‍यांवर भादंवि कलम 302, 392, 504, 506 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास (police) पोलिस निरीक्षक आनंद कोकरे करीत आहेत.

Related Stories

No stories found.