अवैध सावकारीप्रकरणी राजेंद्र बंबला आज न्यायालयात करणार हजर

अवैध सावकारीप्रकरणी राजेंद्र बंबला आज न्यायालयात करणार हजर

धुळे । Dhule। प्रतिनिधी

अवैध सावकार (Illegal moneylender ) राजेंद्र बंब (Rajendra Bomb) याच्या पोलिस कोठडीची (Police cell) मुदत उद्या दि. 14 रोजी संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर (appear in court) करण्यात येणार आहे.

अवैध सावकारीप्रकरणी (Illegal moneylender ) राजेंद्र बंब याच्यावर प्रथम आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आझादनगर पोलिसात दोन व शहर पोलिसात एक गुन्हा दाखल झाला. बंब 13 दिवसांपासून पोलिसा कोठडीत (Police cell) असून आर्थिक गुन्हे शाखेकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे. मात्र तो पोलिसांना असहकार्य करीत आहे. तपासयंत्रणेने बंबच्या घरासह दोन बँक व एका पतसंस्थेच्या च्या लॉकरमधून आतापर्यंत 17 कोटी 74 लाख 76 हजार 369 रूपयांचा मुद्येमाल जप्त केेला आहे.

त्यात 11 कोटी 44 लाख 34 हजार 130 रूपयांची रोकड व 6 कोटी 29 लाख 42 हजार 389 रूपयांच्या दागिन्यांचा समावेश आहे. यासह सौदा पावत्या, एफडी व कागदपत्रे असा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान उद्या दि. 14 रोजी बंबच्या पोलिस कोठडीत मुदत संपत आहे. त्यामुळे त्याला न्यायालयात हजर (appear in court) केले जाईल.

जामीन अर्जावर बुधवारी कामकाज-

राजेंद्र बंब याला आझादनगर व शहर पोलिसात दाखल गुन्ह्यात देखील पोलीस अटक करू शकतात. या गुन्ह्यात अटक करू नये यासाठी, बंब याच्यातर्फे ऍडव्होकेट मोहन भंडारी यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. त्यावरच आज कामकाज होणार होते. याबाबत सरकारी वकील एडवोकेट पराग पाटील यांनी पोलिसांच्या से नुसार दोन दिवसांची मुदत मागून घेतली. त्यानुसार या जामीन अर्ज बुधवार दि.15 रोजी जिल्हा न्यायाधीश क्र.9 एस. सी. पठारे याच्याकडे कामकाज होईल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com