राजेंद्र बंबची कारागृहात रवानगी

आझादनगर पोलीस घेणार ताब्यात
राजेंद्र बंबची कारागृहात रवानगी
illegal moneylender Rajendra Bomb

धुळे ।Dhule । प्रतिनिधी

विमा एजंट (Insurance agent) तथा अवैध सावकार (illegal moneylender) राजेंद्र बंब (Rajendra Bomb) याच्या पोलिस कोठडीची (Police cell) मुदत आज दि. 14 रोजी संपल्याने त्याला दुपारी न्यायालयात हजर (Appeared in court) करण्यात आले. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी (Departure to prison) केली आहे. दरम्यान आझादनगर पोलिसात दाखल एका गुन्ह्यात बंबला (Bomb in a crime) उद्या पोलिस ताब्यात घेणार असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.

राजेंद्र बंब अवैध सावकार
राजेंद्र बंब अवैध सावकार

अवैध सावकारीप्रकरणी राजेंद्र बंबवर जयेश दुसाणे यांच्या फिर्यादीवरून पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा आर्थिक गुन्हे शाखेकडून (Economic Crime Branch) कसून तपास सुरू आहे. बंबच्या घरासह बँक व पतसंस्थेच्या लॉकरमधून रोकड, दागिन्यांसह 17 कोटींचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. त्यात अनेक आक्षेपार्ह कादपत्रांचाही समोवश आहे. बंबकडील डायरीत 400 पेक्षा अधिक लोकांची नावे आढळून आली. त्यास या कादपत्रांचा आर्थिक गुन्हे शाखेकडून बारकाईने अभ्यास केला जात आहे.

दरम्यान, पोलिस कोठडीत बंबन पोलिसांना सहकार्य केले नाही. त्यांच्या पोलिस कोठडीची आज मुदत संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी (Judicial custody) दिली आहे.

दरम्यान बंबवर आझादनगर पोलिसात आणखी दोन गुन्हे दाखल आहेत. एका गुन्ह्यात पोलिस त्याला उद्या ताब्यात घेणार आहेत. तर बंबच्या आणखी एक पतसंस्थेतील लॉकरची लवकरच तपासणी केली जाणार आहे. त्यातूनही काय घबाड हाती येते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहेत.

संजय बंबचा कसून शोध

राजेंद्र बंबचा भाऊ संजय बंब (Brother Sanjay Bomb) हा फरार (Absconding) असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. परंतू तो पोलिस पथकाला (Police squad) गुंगारा देत आहेत. इतर काही संशयीत देखील तपासयंत्रणेच्या रडारवर असून त्याचा पथकाकडून शोध घेतला जात आहे. लवकरच संजय बंबला अटक होण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com