उमर्दा परिसरात वादळी वार्‍यासह पाऊस

वृक्ष उन्मळले, पिकांचे नुकसान, घरांची पडझड
उमर्दा परिसरात वादळी वार्‍यासह पाऊस

शिरपूर । प्रतिनिधी Shirpur

तालुक्यातील उमर्दा परिसरात वादळी वार्‍यासह पाऊस झाला. पावसामुळे शेती, घरांचे तसेच पिकाचे नुकसान झाले. तर काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडली.

उमर्दा परिसरात दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होवून वादळी वार्‍यासह, विजेच्या कडकडाट झाला. व जोरदार पावसाला सुरूवात झाली. या पावसाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना बसला. उन्हाळी पिके काढण्यास सुरुवात केली असतांना, शेतमाल व चारा शेतात असताना पडून होता. ते पाणीखाली गेले. यामुळे चारा व शेतमालाचे मोठ्या प्रमाणात झाली आहे.

पाऊस व वार्‍यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. त्यात लालसिंग आबला वसावे, मनीलाल कालुसिंग पाडवी, मोहन रायसिंग पावरा, जामा पोहल्या पावरा, गोपाल हुनार पाडवी, करमसिंग भारता पावरा, भारता कलजी पावरा यांचे नुकसान झाले. तसेच कुडाचे व पत्र्याचे घरे यांचे नुकसान झाले.

धुळ्यात पावसाची हजेरी

धुळे शहरासह परिसरात अर्धातासापेक्षा जास्त वेळ पावसाने हजेरी लावली. सकाळपासून ऊन पडले होते. परंतु दुपारनंतर वातावरणात बदल झाला. साडेचार वाजेनंतर आकाशात ढग निर्माण झाले. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीपासून पावसाचा वेग चांगला होता. सुमारे अर्धा तास पावसाने धुळे शहराला झोडपून काढले.

Related Stories

No stories found.