देवपूरात भरवस्तीतील धोकेदायक अवैध गॅस भरणाऱ्या पंपावर छापा

7 जण रंगेहात, 60 सिलिंडर, 9 रिक्षासह साडेसात लाखांचा मुद्देमाल हस्तगत
देवपूरात भरवस्तीतील धोकेदायक अवैध गॅस भरणाऱ्या पंपावर  छापा

धुळे Dhule प्रतिनिधी

येथील देवपूर (Devpur) भागातील चंदन नगरात (Chandan Nagar) घरगुती वापराचा (Gas for domestic use)गॅस रिक्षात (filling the rickshaw) भरून देणाऱ्या अवैध गॅस पंपावर (illegal gas pump) आज रात्री सहाय्यक पोलीस अधिक्षक एस ऋषीकेश रेड्डी (Assistant Superintendent of Police S Rishikesh Reddy) यांच्यासह पथकाने कारवाई (Team action) केली. या कारवाईत सात जणांना (Seven people) रंगेहात पकडण्यात (caught red-handed) आले. तर 60 सिलिंडर, 9 रिक्षा (60 cylinders, 9 rickshaws) व इतर साहित्य असा एकूण साडे सात लाखांचा मुद्देमाल (Confiscation of goods) जप्त करण्यात आला.

देवपूरात भरवस्तीतील धोकेदायक अवैध गॅस भरणाऱ्या पंपावर  छापा
जिल्हा दूध संघात आमदार खडसेंना मोठा धक्का

चंदन नगरात दिपक (भैय्या) चौधरी व इतर इसम हे स्वतःच्या भारत, एचपी व इंडियन कंपनीचे गॅस सिलेंडर अवैधरित्या जवळ बाळगुन भरवस्तीत धोकेदायकरित्या इलेक्ट्रीक मोटारीच्या सहाय्याने रेग्युलेटर व नोजल लावुन ॲटोरिक्षामध्ये गॅस भरणा करीत आहेत त्यामुळे लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होवु शकतो, अशी माहिती आज सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सहाय्यक पोलीस अधिक्षक एस. ऋषीकेश रेड्डी यांना मिळाली.

देवपूरात भरवस्तीतील धोकेदायक अवैध गॅस भरणाऱ्या पंपावर  छापा
Breaking News : जिल्हा दुध संघाचे एमडी  मनोज लिमयेसह चौघांना अटक

त्यानुसार त्यांनी कार्यालयातील स्टाप तसेच शहर वाहतुक शाखेच्या सपोनि संगिता राऊत व अंमलदार यांना कार्यालयात बोलावुन बातमीची हकिकत सांगुन कारवाईचे आदेश दिले. पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. तेव्हा ७ इसमांना रिक्षात गॅस भरणा करतांना रंगेहाथ पकडले.

त्यांच्याकडून १ लाख ११ हजार रुपये किंमतीचे एकुण ३७ रिकामे भारत, इंडियन, एच.पी कंपनीचे गॅस सिलेंडर, ९२ हजारांचे एकुण २३ भरलेले भारत, इंडियन, एच. पी कंपनीचे गॅस सिलेंडर, ४ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या एकुण ९ ॲटो रिक्षा, ४५ हजारांच्या गॅस भरणा करण्यासाठी वापरत असलेल्या एकुण ३ इलेक्ट्रीक मोटर, २० हजारांचे २ इलेक्ट्रॉनिक वजन काटा, ३८ हजार २०० रुपये रोख रुपये असा एकुण ७ लाख ५६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.याबाबत देवपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरु होती.

देवपूरात भरवस्तीतील धोकेदायक अवैध गॅस भरणाऱ्या पंपावर  छापा
Visual Story : गर्लफ्रेंडचे ३५ तुकडे अन् ते १८ दिवस!
देवपूरात भरवस्तीतील धोकेदायक अवैध गॅस भरणाऱ्या पंपावर  छापा
Visual Story : ६ वर्ष डेट केलेल्या दीपिका-रणवीरची Untold ‘लव्ह स्टोरी'

ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक एस ऋषीकेश रेड्डी, सपोनि संगिता राऊत, हेकॉ कबीर शेख, रमेश उघडे, मंगा शेमले, चंद्रकांत जोशी, आरीफ शेख, जितेंद्र आखाडे, भागवत पाटील, पोना उमाकांत खापरे, कर्नल चौरे, चंद्रकांत पाटील, नरेंद्र पवार, गणेश ठाकुर, पोकॉ प्रशांत पाटील, विवेक वाघमोडे, अतुल पवार, प्रसन्नकूमार पाटील, सुशिल शेंडे, अकिला शेख, सोनाली बोरसे यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com