धुळ्यात मास्क न लावणार्‍या शेकडो जणांवर दंडात्मक कारवाई

महापालिका व पोलीस यंत्रणेची मोहीम, कोरोनाची नियमावली पाळण्याची जिल्हा प्रशासनाचे आवाहन
धुळ्यात मास्क न लावणार्‍या शेकडो जणांवर दंडात्मक कारवाई

धुळे । Dhule। प्रतिनिधी

शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण (Corona patients growing) वाढत असल्याने प्रशासनाने कठोर पावले उचलून मास्क न लावणार्‍यांवर महापालिका अतिक्रमण विभाग (Municipal Encroachment Department) आणि धुळे शहर पोलिसांनी (Dhule city police) आज कारवाई (Action) केली. ही कारवाई यापूढेही सुरु राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येत वाढत आहे. ही बाब चिंताजनक आहे. राज्य शासनाने सार्वजनिक कार्यक्रमांसह लग्नसोहळा, अंत्ययात्रेवर विविध निर्बंध लागू केले आहेत. तसेच खाजगी कार्यालयांमध्येही 50 टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाला मास्क व सोशल डिस्टन्सिगचा वापर करणे अनिवार्य आहे. असे असताना शहरातील नागरिक मात्र बेफिकिरपणे विनामास्क फिरताना दिसत आहेत. यामुळे कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे आज महापालिका अतिक्रमण विभाग व धुळे शहर पोलिस यांच्या संयुक्त कारवाई करण्यात आली.

आज सकाळी जुन्या महापालिकेच्या इमारती समोर करण्यात आलेल्या कारवाईत सुमारे शेकडो जणांकडून 500 रुपये दंड वसूल करण्यात आला. विनामास्क फिरणारे नागरिक व वाहनधारकांना या ठिकाणी अडवून त्यांची चौकशी करुन हा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमुळे वाहनधारकांची चांगलीच धांदल उडाली होती.

कारवाई मनपा अतिक्रमण विभाग प्रमुख प्रसाद जाधव, राजेंद्र कदम, संजय पवार, भूषण जगदाळे, जाकीर बेग, दिपक पगारे यांच्यासह शहर पोलिसांच्या पथकाने केली. ही कारवाई यापूढेही सुरु राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी मास्क वापरणे आवश्यक असून सोशल डिस्टन्स पाळावे असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

Related Stories

No stories found.