पुण्याच्या व्यावसायिकाचे 40 लाख लूटले

छडवेल शिवारातील घटना, 13 जणांवर गुन्हा दाखल
पुण्याच्या व्यावसायिकाचे 40 लाख लूटले

धुळे । Dhule । प्रतिनिधी

साक्री तालुक्यातील छडवेल शिवारात कॉपर केबल खरेदीसाठी (Buy copper cable) बोलावून पुण्यातील व्यावसायीकाला (businessman) धारदार शस्त्रांचा धाक (Fear of weapons) दाखवून त्यांच्याकडील 40 लाखांची रोकड लुटण्यात (robbed) आली. ही घटना काल भरदिवसा घडली. याप्रकरणी निजामपूर पोलिसात (police) 13 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

रिअल ईस्टेट व्यावसायीक (businessman) दसमेल सुखविंदर कालरा (वय 36 रा. बंगला नं. 10 बोल्ट कल्ब रोड, पुणे) यांनी पोलिसात (police) फिर्याद दाखल केली आहे. त्यांना राजेंद्र पाटील, महेश पाटील व सागर पाटील नामक व्यक्तीने कॉपर केबलची (copper cable) खरेदी करण्यासाठी बोलाविले. त्यानुसार कालरा हे काल दि. 27 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास छडवेल शिवारातील सुझलॉन कंपनीच्या (Suzlon Company) मागे पानचक्कया असलेल्या कच्च्या रस्त्यावर आल्यानंतर वरील तिघांसह इतर आठ ते दहा जणांनी त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच धारदार शस्त्रे व दगडांनी मारण्याचा धाक (Fear of weapons) दाखवून त्यांच्याकडील एअर बॅगेतील एकुण 40 लाख 3 हजारांची रोकड हिसकावून (snatching) पसार झाले. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश राजगुरू करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com