समाजाला दिशा दाखविण्याचे कार्य प्रेरणादायी

दै. देशदूतच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन, पूज्य आनंद जीवन स्वामी यांचे प्रतिपादन
समाजाला दिशा दाखविण्याचे कार्य प्रेरणादायी

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

दै. देशदूतने समाज प्रबोधनात मोलाचा वाटा उचलला असून गेली अनेक वर्ष या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे काम केले जाते आहे.

दिनदर्शिका हे एका अर्थाने दिशादर्शकच काम असल्याचे प्रतिपादन पूज्य आनंद जीवन स्वामी यांनी अनौपचारीक चर्चेत केले.

दै. देशदूतच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन धुळ्यातील स्वामी नारायण मंदिराचे कोठारी संत पूज्य आनंद जीवन स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वामी योगीस्नेह, स्वामी हर्षवर्धन, स्वामी सुबोधसागर यांचीही उपस्थिती होती.

धुळ्याचे वैभव असलेल्या भव्य स्वामी नारायण मंदिराच्या प्रांगणात अतिशय प्रसन्न व पवित्र वातावणात दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

संपुर्ण दिनदर्शिका बारकाईने बघत त्यावरील पानापानावर मांडलेल्या माहितीवर पूज्य स्वामी आनंद जीवन यांनी चर्चा केली. वृत्तपत्राच्या माध्यमातून आपण प्रेरणादायी काम केले असल्याचे सांगत भविष्यातील वाटचालीला आर्शिवादपर शुभेच्छाही दिल्यात.

विजयसिंह जमादारांनी दिला उजाळा

जुन्या पिढीतील पर्यावरण प्रेमी तथा प्रगतशील शेतकरी विजयसिंह राजपूत यांच्या निवासस्थानी जावून त्यांच्याही हस्ते प्रकाशन करण्यात आले.

यावेळी केव्ही एन्टरप्रायजेस्चे संचालक अभिजीत जमादार तसेच हायर कंपनीचे ब्रँच मॅनेजर सागर देव्हारे यांची उपस्थिती होती. श्री. विजयसिंह जमादार यांनी पर्यावरण व कृषी क्षेत्रात केलेले नवनवीन प्रयोग, त्याचा सकारात्मक परिणाम याबाबत चर्चा करतांनाच जुन्या आठवणींना उजाळा दिला.

दै. देशदूतच्या या उपक्रमाचे उभयतांनी कौतुक केले. या प्रकाशन प्रसंगी दै. देशदूतचे ब्युरोचिप अनिल चव्हाण, सहाय्यक व्यवस्थापक पंकज पुराणिक, जाहिरात व्यवस्थापक नितीन कुलकर्णी, छायाचित्रकार गोपाल कापडणीस यांची उपस्थिती होती.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com