मानसशास्त्र विषय शालेय स्तरावर सक्तीचा करावा

संत गाडगे महाराज परिषदेचेशिक्षणमंत्र्यांना निवेदन
मानसशास्त्र विषय शालेय स्तरावर सक्तीचा करावा

धुळे Dhule । प्रतिनिधी

मानसशास्त्र (Psychology) या विषयाचा शालेय व महाविद्यालयीन (school and college) अभ्यासक्रमात सक्तीचा (curriculum of the subject) विषय म्हणून समावेश करावा, अशी मागणी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांच्याकडे करण्यात आली आहे. तसे निवेदन त्यांना नुकतेच मराठा सेवा संघ (Maratha Seva Sangh) प्रणीत संत गाडगे महाराज प्रबोधन परिषदेच्या (State Executive President of Sant Gadge Maharaj Prabodhan Parishad,) प्रदेश कार्याध्यक्ष प्रा. वैशाली पाटील, (Vaishali Patil,) जिल्हाध्यक्षा शारदा पाटील, (District President Sharda Patil) कोषाध्यक्ष आशा पाटील (Treasurer Asha Patil) यांनी मुंबईत दिले.

शालेय अभ्यासक्रमात समाजकारण, अर्थकारण, राजकारण, इतिहास आदी अनेक विषय शिकवले जातात. परंतू स्पर्धेच्या युगात भावनांचे, मनाचे व्यवस्थापन कसे करावे?, ताण तणावाचे व्यवस्थापन कसे करावे?, मनोधैर्य कसे टिकवावे?, घटनांकडे सकरात्मक दृष्टिकोनातून कसे पाहावे?, आनंदी समाधानी आयुष्य कसे जगावे? या प्रश्नांची उत्तरे शालेय अभ्यासक्रमात नसल्याने बालगुन्हेगारी, व्यसनाधीनता, खून, बलात्कार, आत्महत्या, डिप्रेशन, वृद्धापकाळात येणारा एकाकीपण आदी समस्यांना समाजाला सामोरे जावे लागते आहे. त्यामुळे शालेयस्तरापासून महाविद्यालयीन स्तरापर्यंत मानसशास्त्र हा विषय सक्तीने शिकवण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी मंत्री वर्षा गायकवाड यांनी याविषयी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासनही दिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com