पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ढिसाळपणाचा निषेध

भाजपा अनुसूचित जाती आघाडीची निदर्शने
पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ढिसाळपणाचा निषेध

धुळे Dhule । प्रतिनिधी

पंजाब (Punjab) दौर्‍याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या सुरक्षेत ढिसाळपणा (Security laxity) केल्याबद्दल महानगर भाजपा अनुसूचित जाती आघाडीतर्फे (Mahanagar BJP) पंजाबमधील काँग्रेस सरकारचा (Congress government) जाहीर निषेध (Public protest) करण्यात आला. याबाबत जिल्हाधिकार्‍यांना निवेदनही देण्यात आले. तसेच आवारात निदर्शनेही करण्यात आली.

यावेळी भाजपा अनुसूचित जाती आघाडीचे महानगर जिल्हाध्यक्ष प्रदीप पानपाटील, प्रदेश सरचिटणीस महेंद्र खैरनार, प्रदेश चिटणीस नागसेन बोरसे, विनायक अहिरे, मोहित चित्ते, मनुकुमार गोयर, विक्की थोरात, राज ढिवरे आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, देशाचे पंतप्रधान हे दि.5 जानेवारी रोजी पंजाब दौर्‍यावर असताना त्यांना तेथील एका उड्डाणपुलावर 15 ते 20 मिनीटे थांबावे लागले. त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत ढिसाळपणा केल्याने ही घटना घडली. ही घटना अतिशय असमर्थनीय व निंदनीय आहे. पंतप्रधान पद हे संविधानिक असून त्यांच्यासोबत असा निंदनिय प्रकार घडवून आणणे म्हणजे एक प्रकारे आपल्या संविधानाचा अपमान नाही का? पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेमध्ये पंजाब सरकार यंत्रणेचा झालेला ढिसाळपणा म्हणजेच काँग्रेसने गाठलेल्या घृणास्पद वर्तणुकीचा कळस आहे. त्यामुळे आम्ही पंजाबमधील काँग्रेस सरकारचा जिल्हावासियांच्या वतीने जाहीर निषेध करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com