बोरीस येथे विषारी औषध घेवून प्रेमीयुगुलाची आत्महत्या

बोरीस येथे विषारी औषध घेवून प्रेमीयुगुलाची आत्महत्या

सोनगीर Songir। । वार्ताहर

बोरीस (Boris) ता. धुळे येथील प्रेमीयुगलाने (Premiyugula) विषारी द्रव्य प्राशन (poisonous drug) करून आत्महत्या (suicide) केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

दोन्ही विवाहित असून दोघांत प्रेमसंबंध होते. त्यातूनच त्यांनी जगाचा निरोप घेतला असावा असा अंदाज आहे. दि. 16 डिसेंबर रोजी ते पळून गेले होते. त्यानंतर दि. 17 रोजी हरविल्याची फिर्याद येथील पोलीस ठाण्यात देण्यात आली होती.

बोरीस येथील प्रतिभा भगवान पवार (वय 24) व मुकेश दिलीप पवार (वय 26) यांच्यात प्रेमसंबंध होते. ते दोन्ही विवाहित होते व दोघांना प्रत्येकी दोन मुलेही आहेत. दोघे एकाच गल्लीत राहतात. तसेच ते एकाच समाजाचे असून त्यांच्यात चुलत दिर भावजयीचे नाते असल्याचे समजते. पाच दिवसांपूर्वी कोणाला काही न सांगता ते पळून गेले. याबाबत प्रतिभाचे नातलग अरूण चव्हाण यांनी तर मुकेशचे वडील दिलीप पवार यांनी हरविल्याची तक्रार दिली होती. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास एका शेतकर्‍याला प्रतिभाच्या शेतातच दोघांचे प्रेत आढळून आले. पाच दिवसात प्रेत कुजायला लागले होते. शवविच्छेदनानंतर आत्महत्येचे नेमके कारण समजू शकेल. ज्ञानेश्वर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे हे तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com