मान्सून पूर्व तयारी, नकाणे तलावात बोटींची चाचणी

मान्सून पूर्व तयारी, नकाणे तलावात बोटींची चाचणी

धुळे Dhule । प्रतिनिधी

जिल्ह्यात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जलज शर्मा (District Disaster Management Authority Chairman Jalaj Sharma) यांनी सर्वच विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच आपत्ती निवारण्यासाठी उपलब्ध साधनसामग्रीची चाचणी (मॉक ड्रील) (Mock drill) करून ते सुस्थितीत असल्याची खात्री करून घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार धुळे शहरापासून जवळच असलेल्या नकाणे तलावात (Nakane Lake) रंगीत तालिम (Color training) पार पडली. अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी ही माहिती दिली आहे.

आपत्ती निवारण्यासाठी (Disaster mitigation) राज्य शासनाकडून धुळे जिल्ह्यात दोन बोटी (Boat) मिळाल्या आहेत. त्यापैकी एक बोट धुळे महापालिकेकडे, तर एक बोट शिरपूर- वरवाडे नगरपरिषदेकडे वर्ग करण्यात आली आहे. या बोटींची आज जिल्हाधिकारी श्री. शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नकाणे तलावात चाचणी (Test) घेण्यात आली.

यावेळी महापालिकेचे आयुक्त देवीदास टेकाडे, उपायुक्त डॉ. संगीता नांदुरकार, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे समादेशक प्रल्हाद खाडे, सहाय्यक समादेशक चंद्रकांत पारस्कर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. सोनवणे उपस्थित होते.

आयुक्त श्री. टेकाडे म्हणाले, पावसाळ्यास लवकरच (Rainy season) सुरवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेतील (Municipal Corporation) प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद दलानेही (State Disaster Response Force) नियमितपणे सराव करावा. श्री. पारस्कर यांनी सांगितले, की धुळे येथे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची तुकडी कार्यान्वित आहे. या तुकडीतील जवान धुळे जिल्ह्यासह राज्यात ठिकठिकाणी मदतीसाठी धावून गेले आहेत. त्यांचा नियमितपणे सराव सुरू आहे. पोलिस उपनिरीक्षक सुनील जगताप, प्रकाश सोनटक्के, विजय गावंडे, हवालदार मनोज देवरे, अग्निशमन दलाचे अधिकारी श्री. महाजन, श्री. महाले आदींनी रंगीत तालिमीत सहभाग घेतला.

गावपातळीवर आपत्ती निवारण समिती गठित करा

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील प्रत्येक गावात तहसीलदारांनी मंडळाधिकार्‍यांच्या माध्यमातून गावस्तरीय आपत्ती निवारण समिती (Village Level Disaster Management Committee) गठित करावी. समितीच्या माध्यमातून नियोजन करीत आपत्ती निवारणाचा आराखडा तयार करून ठेवावा. तसेच या समितीची बैठक आयोजित करून मान्सून पूर्व कामांचा आढावा घेत समितीच्या सदस्यांना आपत्ती काळात करावयाच्या उपाययोजना, प्रथमोपचाराची माहिती द्यावी. त्यांचा प्रशिक्षण वर्ग घ्यावा, अशा आशयाचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जलज शर्मा यांनी दिले आहेत.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची (District Disaster Management Authority) नुकतीच बैठक झाली. त्यास अनुसरून जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी महसूल विभागाला सविस्तर सूचना दिल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे, सर्व तहसीलदारांनी 24 तास कार्यरत राहील, असा स्वतंत्र नियंत्रण कक्ष कार्यान्वित करून अहवाल सादर करावा. या नियंत्रण कक्षात 24 तास कर्मचार्‍याची नियुक्ती करावी. तहसीलदारांनी त्यांच्या कार्यालयास पुरविलेले साहित्य, साधनसामग्रीचा आढावा घ्यावा. लाइफ जॅकेट, दोर, सर्च लाइट, बोट आदींची सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. रेनगेजची तपासणी करून सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी.

त्यासाठी कृषी विभागाचीही (Department of Agriculture) मदत घ्यावी. सर्व तहसीलदार, मंडळाधिकार्‍यांनी मंडळस्तरावरील दैनंदिन पावसाची आकडेवारी विषयीची माहिती जिल्हा प्रशासनास रोज सकाळी आठवाजेपर्यंत जिल्हा नियंत्रण कक्षात (District Control Room) अचूक पाठवावी. तसेच ही माहिती गुगल शीट तयार करून दररोज अद्ययावत करावी.

पुराची सूचना (Flood notice) मिळताच गावपातळीवरील समितीच्या माध्यमातून नदी परिसरातील लोकांना तत्काळ संदेश द्यावा. त्यांना आवश्यकतेनुसार सुरक्षितस्थळी हलविण्याचे नियोजन करावे. आपत्ती आल्यावर गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्या साठी समाजमंदिर, शाळा, मंगल कार्यालय आदी सुरक्षित जागा तात्पुरत्या निवार्‍यासाठी निश्चित करून ठेवाव्यात.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com