वाहतूकीचे नियम मोडणार्‍यांना पोलिसांचा दणका

वर्षभरात 63 हजार वाहनधारकांवर कारवाई; 58 लाखांचा दंड वसूल, 83 लाख प्रलंबित
वाहतूकीचे नियम मोडणार्‍यांना पोलिसांचा दणका

राम निकुंभ

धुळे । Dhule

शहरात वाहतूकीचे नियम (Traffic rules) मोडणे वाहन धारकांना (vehicle holders) चांगलेच महागात पडले असून शहर वाहतूक पोलिसांनी (City Traffic Police) गेल्या वर्षभरात तब्बल 63 हजार वाहनधारकांवर कारवाईचा (Action) बडगा उगारला आहे. त्यांच्याकडून एकुण 57 लाख 89 हजारांचा दंड वसूल करण्यात आला असून तब्बल 83 लाख 81 हजार रूपये दंडाची रक्कम मात्र वाहनधारकांकडे प्रलंबित आहे.

वाहन चालविण्याचा परवाना (License) जवळ नाही, शहरात कुठेही वाहन पार्किंग करणे, नंबर प्लेट नसणे, असल्यास तुटलेली व फॅन्सी ठेवणे असे नियम (rules)मोडणार्‍या वाहन चालकांवर सर्वाधिक कारवाई (Action) करण्यात आली. जनजागृती करूनही नियमभंग करणार्‍यांवर अंकुश ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी (City Traffic Police)मोठ्या प्रमाणात कारवाईचा बडगा उगारला आहे. सन 2021 मध्ये एकुण 63 हजार 672 वाहन धारकांवर कारवाई करण्यात आली. त्यात 27 हजार 838 कारवाई या पेड अर्थात जागीच दंड वसूल केल्याच्या आहेत. तर 35 हजार 740 वाहन अनपेड तर 96 जणांना न्यायालयात पाठविण्यात आले. त्यांना एकुण एक कोटी 41 लाख 70 हजार 800 रूपयांचा दंड आकारण्यात आला. त्यातून 57 लाख 89 हजार 550 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर 83 लाख 81 हजार 250 रूपये दंड प्रलंबित आहेत. तोही वसुलीची कार्यवाही केली जात आहे.

दरम्यान, अपघाताच्या (Accident) वाढत्या घटना व वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी केंद्र शासनाच्या मोटार वाहतूक विभागाने नुकतीच वाहन कायद्यात (vehicle law) सुधारणा केली असून वाहतूकीचे नवीन नियमही वाहतूक पोलिसांनी अंमलात आणण्यास सुरवात केली आहे. शहरातून ट्रीपल सीट फिरणे, कर्णकर्कश हॉर्न वाजविणे, दुचाकीला फॅन्सी नंबर प्लेट असणे, वाहन परवाना नसताना वाहने चालविणे, कुठेही वाहने पार्किंग करून वाहतुकीचा नियभंग (Disruption of traffic) करणार्‍या वाहन चालकाडून दंड वसूल करण्याची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. शहरात सुसाट वाहने चालवून स्वतःबरोबर दुसर्‍याचा जीव धोक्यात घालणार्‍या वाहन चालकांची संख्या वाढली आहे. याच्यावर अकुंश ठेवण्यासाठी वाहतुकीच्या नव्या नियमाला गृहीत धरून वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई (Punitive action) करण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे. आता वाहन चालकांनी (motorists) वाहतूकीचा नियम मोडल्यास जबरदस्त दंड भरावा लागणार आहे. आधी 200 रुपयांचा दंड भरून सुटका करण्यात येत होती आता मात्र नव्या नियमनानुसार वाहनचालकांना पाच पट म्हणजे हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.

वाहन परवाना न बाळगणारे अधिक

धुळे शहर वाहतूक शाखेकडून गेल्या वर्षभरातील कारवाईमध्ये सर्वाधिक वाहन परवाना (Vehicle license) जवळ न बाळगता वाहन चालविणार्‍या तब्बल दहा हजार 733 जणांवर कारवाई(Action) करण्यात आली. त्यानंतर नो पार्कीगमध्ये वाहने लावणे नऊ हजार, नंबर प्लेट नसणे, तुटलेली असणे व फॅन्सी नंबर प्लेट असणार्‍या साडेचार हजार वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे.

महाट्राफिक अ‍ॅपवरून भरा दंड

नवीन नियमांनुसार आता राज्यात कोठेही दंड वसूल केला जाईल. कारवाई केल्यानंतर पैसे नसतील तर अनपेड कारवाई करून नंतर दंड वसूल केला जातो. वाहन धारक आपला प्रलंबित दंड महाट्राफिक (Mahatraffic) या अ‍ॅपवरून (App) देखील भरू शकतात. सहा महिन्यानंतरही दंड न भरल्यास अशा वाहनधारकांना लोकन्यायालयाकडून नोटीस पाठविली जाते. त्यामुळे दंड भरून सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com