शेत नावावर करण्यासाठी गरोदर महिलेवर विषप्रयोग, चौघांवर गुन्हा

शेत नावावर करण्यासाठी गरोदर महिलेवर विषप्रयोग, चौघांवर गुन्हा
Crime

धुळे । Dhule । प्रतिनिधी

शेती नावावर (name of agriculture) करून देण्याच्या कारणावरून गरोदर महिलेला (pregnant woman विष पाजुन (Poisoning) मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी देवपूरात घडली. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसात (police) चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशाबाई बाळासाहेब पाटील (Ashabai Balasaheb Patil) (वय 25 रा. आधार नगर, गुलमोहर सोसायटी, वाडीभोकर रोड, देवपूर, धुळे) असे त्या महिलेचे नाव आहे. याबाबत त्यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

त्यानुसार शनिवारी सायंकाळी साडेसहा ते सात वाजेदरम्यान गोंदूर (ता. धुळे) येथील शेती नावावर करून द्या, या कारणावरून मधुकर फुला पाटील, नलिनीबाई मधुकर पाटील, देवदत्त मधुकर पाटील व शिवदत्त मधुकर पाटील (रा. मयुर शाळेजवळ, देवपूर) या चौघांनी आशाबाई ही गरोदर असल्याचे माहिती असतांना देखील तिला जबरीने काहीतरी विषारी (Poisoning) द्रव्य पाजुन तिला जिवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. त्यानुसार वरील चौघांवर भादंवि कलम 307, 312 व 34 प्रमाणे गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक सैय्यद करीत आहेत.

Related Stories

No stories found.