पंतप्रधान मोदींनी साधला अनाथ बालकांशी संवाद

मंत्री स्मृती इराणींचीही उपस्थिती, प्रधानमंत्री केअर फॉर चिल्ड्रेन योजनेंतर्गत प्रमाणपत्रांचे वितरण
पंतप्रधान मोदींनी साधला अनाथ बालकांशी संवाद

धुळे । Dhule प्रतिनिधी

प्रधानमंत्री केअर फॉर चिल्ड्रेन (Prime Minister Care for Children) योजनेंतर्गत कोविड- 19 (Kovid) मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांशी (Parents with lost children) आज सकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी ऑनलाइन संवाद (Online communication) साधला. केंद्रीय महिला व बालविकास विभागाच्या मंत्री स्मृती इराणी (Union Minister for Women and Child Development Smriti Irani) या देखील ऑनलाइन सहभागी झाल्या होत्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातून (Collector's Office) या कार्यक्रमात खा.डॉ. सुभाष भामरे, आ.काशिनाथ पावरा, अपर जिल्हाधिकारी डॉ.नंदकुमार बेडसे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सचिन शिंदे, जिल्हा परिविक्षा अधिकारी एम.एम. बागूल, मुला- मुलींच्या निरीक्षण गृहाच्या अधिक्षिका अर्चना पाटील, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सतीश चव्हाण आदींसह अनाथ मुले, त्यांचे पालक, नातेवाईक सहभागी झाले होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते धुळे जिल्ह्यातील 17 अनाथ बालकांना प्रधानमंत्री श्री.मोदी यांचे पत्र, पीएम केअर योजनेचे स्नेह प्रमाणपत्र, (Affection certificate of PM care scheme) आयुष्यमान भारत विमा योजनेचे कार्ड, टपाल खात्याचे पासबुक(Postal account passbook) आदींचे वितरण करण्यात आले.

खा.डॉ.भामरे यांनी अनाथ बालकांना मार्गदर्शन केले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी (District Women and Child Development Officer) श्री.शिंदे यांनी सांगितले की, कोविड- 19 दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या 17 आहे. या बालकांना देण्यात येणार्‍या मदतीची त्यांनी सविस्तर माहिती दिली.

यावेळी प्र.परिविक्षा अधिकारी राकेश नेरकर, संरक्षण अधिकारी चंद्रकिरण शिसोदे, बालकल्याण समितीच्या सदस्या मंगला चौधरी, वैशाली पाटील, बाल न्याय मंडळाच्या सदस्या राजश्री ठाकूर, जयश्री पाटील, संरक्षण अधिकारी तृप्ती पाटील, देवेंद्र मोहन, वसंत पाटील, सामाजिक कार्यकर्ता योगेश धनगर, क्षेत्रीय कार्यकर्ता दीपक रंधे, विजय राजपूत, अश्विनी देसले यांच्यासह आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com