पिंपळनेरचा वीज पुरवठा सुरळीत, वीजवितरणाच्या पथकाचा केला सन्मान

पिंपळनेरचा वीज पुरवठा सुरळीत, वीजवितरणाच्या पथकाचा केला सन्मान

पिंपळनेर Pimpalner । वार्ताहर

पिंपळनेर व परिसराला दोन दिवसांपासुन वादळी वार्‍यासह (Heavy rain) मुसळधार पावसाने (strong winds) झोडपून काढले. यावेळी अनेक मेन लाईन व विज खांब कोसळले. त्यामुळे दोन दिवसांपासुन विज पुरवठा खंडीत (Power outage) झालेला होता. सर्व व्यवहार बंद होते. पंरतू विज कंपनीच्या पथकाने (power company's team) अथक परिश्रम घेत अखेर आज विज पुरवठा सुरळीत (Power supply smooth) केला.

मुसळधार पावसामुळे (Heavy rain)पिंपळनेरचा विज पुरवठा खंडीत (Power outage) झाल्यानंतर विज वितरण कंपनीच्या सर्व अधिकारी व कर्मचारी जिवाचे रान करत अखंड काम करीत आहेत. मात्र रोजच्या वादळी वार्‍यासह मुसळधार पावसामुळे त्यांनाही काम करण जिकरीचे झाले आहे.

मात्र या भयनक परीस्थीतीवर मात करत पिंपळनेर विज वितरण कंपनीचे दिनेश पवार, इंजि.उमेश पाटील यांनी कर्मचारी कैलास सुर्यवंशी, जगदीश देसले, निलेश कामे, विकास पगारे, योगेश भदाणे, मनिलाल बहीरम, योगेश देवरे, दीपक मोरे, रवी साळुंखे, जितेंद्र देवरे, संजु कुवर याच्या मदतीने अहोरात्र इलेक्ट्रीक पोल, तारा, डीपींची दुरूस्ती करून आज पहाटे तीन वाजेपर्यंत पिंपळनेर शहराचा विद्युत पुरवठा सुरळीत (Power supply smooth) केला.

तर सामोडे व इतर गावांचा विज पुरवठाही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच अत्यावश्यक मोबाईल सेवाही या पावसामुळे बंद झाली होती. ते कामही बीएसएनएलचे ढगळे व त्यांचे कर्मचारी करत आहेत.

यासर्व कर्मचार्‍यांचा पत्रकार सुभाष जगताप स्पॉटवर यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार करत त्यांच्या कामाचे कौतुक केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com