पिकअप चालकाच्या लुटीचा असा लागला छडा

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: रोकडसह मोबाईल केला हस्तगत: टोळीतील चौंघा साथीदारांचा कसुन शोध
पिकअप चालकाच्या लुटीचा असा लागला छडा

धुळे dhule । प्रतिनिधी

तालुक्यातील नवलनगर ते नंदाळे दरम्यान अंबोडे गावानजीक पिकअप चालकाच्या (pickup driver) लुटीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (local crime branch team) छडा (Investigated)लावला आहे. लुट करणार्‍या टोळीतील एकास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 5 हजारांची रोकड व मोबाईल हस्तगत करण्यात आला. तर त्याच्या चौघा साथीदारांचाही कसुन शोध सुरू करण्यात आला आहे.

हेंकळवाडी, (ता.धुळे) येथील समाधान बिजलाल पाटील (वय 27) हा दि. 18 मार्च रोजी दुपारी पावणे बारा वाजेच्या सुमारास त्यांच्या ताब्यातील पिकअप वाहन घेवून (क्र. एमएच 46 बीबी 9670) नवलनगरकडुन नंदाळेकडे जात होता. त्यादरम्यान अंबोडे गावाजवळील डोंगराजवळ चार अज्ञात इसमांनी कारमध्ये येवुन त्यांनी पिकअप वाहन अडविले. चालक समाधान पाटील यांच्याकडून जबरदस्तीने 40 हजार रुपये किंमतीची सोनसाखळी व 10 हजार रुपये रोख असा ऐवज जबरीने लुटून नेला.

याप्रकरणी धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा स्थानीक गुन्हे शाखेकडुन समांतर तपास सुरु होता. त्यादरम्यान पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने रमजान मेहबुब पठाण, (वय 23 रा.ईब्राहीम मस्जीद, सरदार हॉल समोर, हाफीज सिद्धी नगर, वडजाई रोड, धुळे) यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हा गुन्हा त्याचे साथीदार विजय रामक्रिष्ण गायकवाड (रा. रामनगर धुळे), वसीम हुसेन शेख उर्फ वसीम बाटला (रा. जनता सोसायटी, धुळे), सत्तार मासुन पिंजारी उर्फ सत्तार मेंटल (रा.पत्रावाली मस्जीदजवळ, धुळे) यांच्यासह मिळुन केल्याची कबुली दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोसई योगेश राऊत, असई संजय पाटील, पोहवा श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, योगेश चव्हाण, पोना पंकज खैरमोडे, कमलेश सुर्यवंशी, राहुल गिरी, मयुर पाटील, अमोल जाधव, विनोद पाठक, जगदिश सुर्यवंशी, योगेश ठाकुर यांनी केली आहे.

कारसह पुरविली माहिती

हा गुन्हा करण्यासाठी मनोज शंकर पारेराव (रा. संगमा चौक, धुळे) याने गुन्हा करण्यासाठी कार उपलब्ध करुन दिल्यासह फिर्यादी समाधान पाटील यांची माहीती पुरवुन त्याच्या सांगण्यावरुन गुन्हा केल्याची कबुली दिली. रमजान मेहबुब पठाण याच्याकडून 5 हजारारुपये रोख व 1 हजाराचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच त्याला पुढील तपासासाठी धुळे तालुका पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. इतर आरोपीतांचा शोध सुरु करण्यात आला आहे.

तिघे अट्टल गुन्हेगार

या टोळीतील मनोज पारेराव, सत्तार मासुम पिंजारी आणि विजय गायकवाड हे तिघे अट्टल गुन्हेगार असून मनोजवर धुळे शहर पोलिसात तब्बल 11 गुन्हे दाखल आहेत. तर सत्तार पिंजारीवर आझादनगर 6, चाळीसगाव रोड 3, विसरवाडी 2, साक्री, चाळीसगाव, पिंपळनेर, सोनगीर व वणी पोलिसात प्रत्येकी एक गुन्हा नोंद आहे. तसेच विजयवर आझादनगर 3 व सोनगीर पोलिसात एक गुन्हा दाखल आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com