Photo# भारत जोडो यात्रेत घडले खान्देश संस्कृतीचे दर्शन

एकतेचे दमदार प्रेझेंटेशन, आ.कुणाल पाटील यांनी वेधले लक्ष
Photo# भारत जोडो यात्रेत घडले खान्देश संस्कृतीचे दर्शन

धुळे - प्रतिनिधी dhule

प्रचंड उत्साहात आणि जल्लोषात सकाळी जांभरून फाटा वाशिम (Washim) येथून निघालेल्या भारत जोडो यात्रेमध्ये (bharat jodo yatra) देशाचे युवा नेते खा.राहुल गांधी (MP Rahul Gandhi) यांच्यासमोर आ.कुणाल पाटील (mla Kunal Patil) यांनी खान्देश संस्कृती (Khandesh culture) आणि एकतेचे दमदार प्रेझेंटेशन केले. त्यामुळे विदर्भाच्या भूमीत आपला ठसा उमटवीत खान्देशवाशियांनी विदर्भवासीयांचे (Vidarbha) लक्ष वेधून घेतले.

Photo# भारत जोडो यात्रेत घडले खान्देश संस्कृतीचे दर्शन
Visual Story अभिनेत्री प्राजक्ताचं पहिलं प्रेम...

खा.राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भारत जोडो यात्रा सुरू असून या यात्रेचे महाराष्ट्रात आगमन झाले आहे.

आज दि.16 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वा. जांभरुण फाटा वाशिम येथून भारत जोडो यात्रेला प्रारंभ झाला. सकाळपासूनच खा.राहुल गांधी यांच्यासोबत आ.कुणाल पाटील आणि धुळे जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी यात्रेमध्ये सहभागी झाले होते.

Photo# भारत जोडो यात्रेत घडले खान्देश संस्कृतीचे दर्शन
Visual Story अभिनेत्री प्राजक्ताचं पहिलं प्रेम...

कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाने जल्लोषाचे वातावरण होते.सकाळच्या पहील्या सत्रात कार्यकर्त्यांनी व आ.पाटील यांनी खा.राहूल गांधींसोबत सुमारे 15 कि.मी.अंतर कापले.

यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. ते तीन दिवस खा.राहूल गांधींसोबत - धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील हे गेल्या तीन दिवसापासून भारत जोडो यात्रेत सामील झाले आहेत.

तेव्हापासून आ.पाटील हे खा.राहूल गांधींसोबत हातात हात घालून चालत आहेत. प्रत्येक दिवशी ते तब्बल सहा ते सात तास खा.गांधींसोबत चालत आहेत. खा.राहूल गांधींसोबत चालतांना त्यांच्या चर्चेतून वाढती महागाई, बेरोजगारी आणि विशेष करून शेतक-यांविषयी असलेली चिंता व्यक्त केली जात होती.

तर महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील धावती माहितीही ते जाणून घेतात. अर्थातच मी उत्तर महाराष्ट्रातून येत असल्याने शेतकरी व युवकांच्या प्रश्न त्यांच्याकडे प्रकर्षाने मांडले.

गेल्या तीन दिवसाच्या सहवासात खा.राहूल गांधी हेच खरे देशाचे भवितव्य असून देश आणि देशवासियांच्या हितासाठीच ही भारत जोडो यात्रा असल्याची माहीती आ.कुणाल पाटील यांनी दिली. गेल्या तीन दिवसापासून आ.कुणाल पाटील हे खा.राहूल गांधींसोबत हातात हात घालून चालत असल्याने भारत जोडो यात्रेत ते चांगलेच निकटवर्तीय मानले जाऊ लागले आहेत.

खान्देशी ठसा आणि बाणा- खान्देशातील आदिवासी नृत्य आणि कलापथकाने खा.राहूल गांधी यांचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी त्यांना आदिवासी नृत्याचा मोह आवरता आला नाही, त्यामुळे त्यांनी आदिवासी नृत्यावर ठेका धरला.

संपूर्ण भारत जोडो यात्रेत सकाळच्या सत्रात साक्री-पिंपळनेर भागातील आदिवासी बांधवांचे नृत्य कलापथक आणि नंदाणे ता.धुळे येथील होलार वाजंत्रीने खान्देशी ठसा आणि बाणा विदर्भवासयांच्या मनावर बिंबविला.

खान्देशी पगडी देऊन स्वागत

खा. राहुल गांधी यांच्यासमोर आदिवासी नृत्य सादर करण्यात आले. यावेळी प्रारंभी आ.कुणाल पाटील यांनी खान्देशाचा गौरव असलेली खान्देशी पगडी देऊन खा.गांधी यांचे स्वागत केले. खा. राहुल गांधी यांनी खान्देशवाशीयांचा मान ठेवीत पगडी परिधान केली. त्यामुळे खानदेशाचा गौरवच झाला असल्याचा अभिमान उपस्थितांना झाला.

वाशिम येथे धुळे जिल्ह्यातून आ. कुणाल पाटील यांच्यासोबत माजी खा.बापू चौरे, माजी आ.डी.एस. आहिरे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, शिवसेनाप्रमुख महेशभाऊ मिस्त्री, शहराध्यक्ष डॉ.अनिल भामरे, गुलाबराव कोतेकर, लहू पाटील, डॉ. दरबारसिंग गिरासे, भगवान आप्पा गर्दे, पंढरीनाथ पाटील, रितेश पाटील, रावसाहेब पाटील, इंटक जिल्हाध्यक्ष प्रमोद सिसोदे, अशोक सुडके, भानुदास गांगुर्डे, दीपक साळुंखे, अरूण पाटील, महिला अध्यक्षा गायत्री जयस्वाल, विमलताई बेडसे, ॲड.बी.डी.पाटील, योगेश पाटील, एन.डी.पाटील, प्रदीप देसले, सोमनाथ पाटील, शिंदखेडा येथील प्रकाश पाटील, प्रा.मुकेश पाटील, गणेश गर्दे, राजीव पाटील, हर्षल साळुंखे, पंकज पाटील, हरीष पाटील, सतिष रवंदळे, प्रज्योत देसले यांच्यासह धुळे जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com