18 लाखांचा गांजा जप्त, आरोपी फरार

स्थानिक गुन्हे शाखा व पिंपळनेर पोलिस पथकाची कामगिरी
18 लाखांचा गांजा जप्त, आरोपी फरार

धुळे : dhule

साक्री (Sakri) तालुक्यातील गव्हाणीपाडा पो. उमरपाडा शिवारात (lcb) स्थानिक गुन्हे शाखा व (Pimpalner Police) पिंपळनेर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत तब्बल 18 लाखांचा एकुण 180 किलो गांजा जप्त केला. परंतू अंधाराचा फायदा घेत आरोपी पसार झाला.

आज पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. गव्हाळीपाडा पो. उमरपाडा येथे राहणारा दिलीप बारश्या कुवर याने राहत्या घरासमोरील पत्रटी शेडमध्ये स्वतःच्या स्वार्धासाठी मानवी मनोव्यापारावर परिणाम करणारा गांजा या अंमली पदार्थाचा साठा केल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.

त्यानुसार पहाटे 2.20 वाजेच्या पथकाने तेथे छापा टाकला. तेव्हा पोलिसांची चाहुल लागताच दिलीप कुवर हा अंधारात पसार झाला. शेडमध्ये 180 किलो गांजा मिळून आला. त्यांची किंमत 18 लाख रूपये असून तो जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलिस शिपाई राहुल गिरी यांच्या फिर्यादीवरून आरोपीवर पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास एपीआय साळुंखे करीत आहेत.

Related Stories

No stories found.