अट्टल चोरटे जेरबंद, दहा दुचाकी हस्तगत

धुळे तालुका पोलिसांची कामगिरी
अट्टल चोरटे जेरबंद, दहा दुचाकी हस्तगत

धुळे - dhule

शहरासह शेजारील जिल्ह्यातून दुचाकी चोरणाऱ्या (Bike thief) अट्टल चोरट्यांना तालुका (police) पोलिसांनी मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून चोरीच्या दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या. विशेष म्हणजे यातील एक चोरटा वारंवार राहण्याची ठिकाणी व मोबाईल (Mobile) क्रमांक बदलत होता, अशी माहिती पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील (Superintendent of Police Pravin Kumar Patil) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बोरकुंड (ता.धुळे) शिवारातील एकाची दुचाकी चोरट्यांनी दि.23 एप्रिल रोजी चोरून नेली होती. याबाबत तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा योगेश शिवाजी दाभाडे (रा.बळसाणे ता.साक्री) याने केला असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली. त्यानुसार त्याच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाने संशयीत आरोपीचा शोध सुरू केला.

मात्र तो वारंवार राहण्याची ठिकाणे व मोबाईल नंबर बदलत असल्यामुळे पथकाने मोठ्या कौशल्याने त्याची माहिती काढून त्याला नाशिक येथून शिताफिने ताब्यात घेतले. तसेच त्याचा साथीदार अंकुश एकनाथ शिरसाठ (रा.खडकी ता.चाळीसगाव) याला देखील ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी एकुण 9 दुचाकी चोरीची कबुली दिली. त्या हस्तगत करण्यात आल्या.

तसेच तालुका पोलिसात दाखल गुन्ह्यातील आरोपी विजय साईनाथ चव्हाण याच्याकडून देखील एक चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. अशा एकूण चोरीच्या दहा दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, असई सुनिल विंचुरकर, पोहेकॉ प्रविण पाटील, पोना अविनाश गहीवड, पोकॉ धिरज सांगळे, कुणाल शिंगाणे, नितीन दिवसे, कांतीलाल शिरसाठ, राकेश मोरे, प्रमोद पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com