दुचाकीच्या धडकेत पादचारी महिला ठार

दुचाकीच्या धडकेत पादचारी महिला ठार

धुळे ।Dhule । प्रतिनिधी

साक्री तालुक्यातील नवलाणे शिवारात भरधाव दुचाकीने (Bhardhaw by bike) दिलेल्या धडकेत (collision) पादचारी (Pedestrian) महिला ठार (woman killed) झाली. तर आणखी एक महिला जखमी झाली आहे. काल दुपारीचार वाजेच्या सुमारास हा अपघात (Accident) झाला. याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सबुबाई साहेबराव पवार असे मयत तर अरूणाबाई संदीप निकम (वय 24 रा. रामनगर, मालपूर ता. साक्री) असे जखमी महिलेचे नाव आहे. दोघी रस्त्याने पायी जात असतांना त्यांना मागून भरधाव वेगाने येणार्‍या अज्ञात दुचाकीने (bike) जोरदार धडक (collision) दिली. त्यात सबुबाई या गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याबाबत जखमी अरूणाबाई निकम यांनी साक्री पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात दुचाकी चालकावर गुन्हा (crime)दाखल झाला आहे. तपास पोहेकाँ अहिरे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com