नवकल्पना आणि सर्वोत्तम पद्धतींमध्ये दोंडाईचा पालिकेची उत्कृष्ट कामगिरी

नगराध्यक्षा नयनकुंवर रावल, मुख्याधिकारी डॉ.प्रविण निकम यांचा गौरव
नवकल्पना आणि सर्वोत्तम पद्धतींमध्ये दोंडाईचा पालिकेची उत्कृष्ट कामगिरी

दोंडाईचा Dondaicha । प्रतिनिधी

स्वच्छ सर्वेक्षण 2021,(Clean Survey 2021,) सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज, (Safai Mitra Safety Challenge,) कचरामुक्त शहर मानांकन (Garbage Free City Rating)या स्पर्धा केंद्र शासनामार्फत (Central Government) आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेने (Dondaicha Varvade Municipal Council) स्वच्छ सर्वेक्षणमध्ये उत्तम कामगिरी (Great performance) करुन भारताच्या पश्चिम विभागात 27 वा तर राज्यात दुसरा क्रमांक (Second in the state) मिळविला आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत दिल्ली येथील विज्ञान भवनात दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.नयनकुंवर रावल, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम, आरोग्य निरीक्षक शरद महाजन, माजी आरोग्य सभापती मनिषा जितेंद्र गिरासे, नगरसेवक नरेंद्र राजपूत यांचा गौरव करण्यात आला.

आवासन आणि शहरी विकास मंत्रालयाच्या माध्यमातून आयोजित या पुरस्काराच्या वितरणासाठी महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद, हरदीप सिंह पुरी, ना. कौशल किशोर, सचिव दुर्गा शंकर मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत दोंडाईचा पालिकेने कचरा संकलन करण्यासाठी घंटागाडी ही प्रभागनिहाय सोय केली आहे. कचरा विलगीकरनसाठी नागरिकांमध्ये जनजागृती केली होती, त्यामुळे शंभर टक्के कचरा संकलन करून त्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प देखील पालिकेने उभारला आहे. त्यातून कंपोस्ट खताची निर्मिती केली जाते. शहर हे अगोदरच हागणदारी मुक्त झाले असून नागरिकांनी उघड्यावर शौचास बसू नये म्हणून ठिकठिकाणी सार्वजनिक शौचालय देखील बांधले आहेत. जमा होणारा मैलावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रकिया केली जाते. शहरातील रस्ते स्वच्छ केले जातात, नियमित गटार साफ सफाई करणे आदी कामे उत्कृष्ट पध्दतीने केली जात असल्याने हा पुरस्कार दोंडाईचा नगरपालिकेला केंद्र सरकारने प्रदान केला आहे. याचे सर्वेक्षण देखील त्रयस्थ संस्थेला देण्यात आले होते. त्यांनी गुणांच्या आधारे पालिकेची निवड केली आहे. दोंडाईचा नगरपरिषदेस हा पुरस्कार स्वच्छतेत नाविन्यपूर्ण उपक्रम व बेस्ट प्रॅक्टिस या कॅटेगरीमध्ये प्राप्त झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com