जिल्ह्यात तुरीवर शेंगअळीचा प्रादूर्भाव

बदलत्या हवामानाचा परिणाम, उत्पादनात घट येण्याची शक्यता, शेतकर्‍यांमध्ये चिंता
जिल्ह्यात तुरीवर शेंगअळीचा प्रादूर्भाव

धुळे Dhule । प्रतिनिधी

जिल्हयात दोन दिवसांपुर्वी झालेला पाऊस (rain) हा रब्बी हंगामासाठी (rabbi season) पोषक होता पण वातावरण बदलाचे परिणाम आता खरीप हंगामातील (Kharif season) पिकावर जाणवू लागले आहेत. या अवकाळी पावसामुळे कापसाच्या बोंड्याचे (Damage to cotton bolls) नुकसान झाले आहे तर तुरलाही धोका (Danger to Turla) निर्माण झाला आहे.

खरीप हंगामातील कापूस आणि तुर ही दोनच पिके सध्या आहे. कापसाची वेचणी सुरु झाली आहे. मात्र, तुर पिक हे फुलअवस्थेतच आहे. बदलत्या वातावरणामुळे तुरवर अळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे तर फुलगळतीचे प्रमाणही वाढलेले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी योग्य वेळीच फवारणीची कामे केली तरच हे पीक देखील पदरात पडणार आहे.

मध्यंतरीच्या अतिवृष्टीने कांदा या पिकाचे नुकसान झाले होते तर आता अवकाळी पावसाचा परिणाम हा कापूस आणि तुरवर होऊ लागला आहे. सध्या तूर ही फुलोर्‍यात ते शेंग लागणीच्या अवस्थेत आहे. त्यामुळे या पिकातून शेतकर्‍यांना उत्पादनाची आशा आहे. मात्र, कांदाप्रमाणेच अंतिम टप्प्यात तुरीची अवस्था झालेले आहे. मात्र, अधिकचे नुकसान टाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्यासाठी शेतकर्‍यांकडे फवारणीचा पर्याय आहे. उत्पादनात होणार घट, फवारणीसाठी शेतकर्‍यांची धावपळ सुरू असून मध्यंतरीच्या पावसातून तुर पिकाला फटका बसलेला नाही. पण सध्याच्या बदलत्या वातावरणाचा धोका निर्माण झाला आहे.

खान्देशातील वातावरणात बदल झालेला आहे. ढगाळ वातावरण अद्यापही कायम आहे. त्यामुळे तुरवर शेंगअळीचा प्रादुर्भाव झालेला आहे शिवाय फुल गळतीचे प्रमाणही वाढलेले आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यात आलेले पिक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकरी आता फवारणीच्या कामाला लागलेला आहे. शिवाय किटकनाशकांचे दरही वाढलेले आहेत. मात्र, कांदाप्रमाणेच तुरचेही नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी फवारणी करुन घेत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com