दडपशाहीचा विधान परिषदेत पर्दाफाश करणार

धुळ्यात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा आघाडी सरकारवर घणाघात
दडपशाहीचा विधान परिषदेत पर्दाफाश करणार

धुळे Dhule। प्रतिनिधी

साक्रीत भाजपने (BJP) बहुमत मिळवले. हे अपयश पचनी न पडल्याने तेथील विरोधी पक्ष (Opposition) व आघाडी सरकार (government) सूडाचे राजकारण करीत आहे. नगरपंचायतीच्या निवडणूक निकालानंतर एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणाचे भांडवल करत भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर खोटा गुन्हा (False crime) दाखल करण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी सरकारच्या दबावाला बळी न पडता निष्पक्षपणे चौकशी करावी. अन्यथा या प्रकरणी सीबीआय चौकशी (CBI inquiry) लावून न्यायालयात दाद मागितली जाईल. तसेच एक विरोधी पक्षनेता (Leader of the Opposition) म्हणून आघाडी सरकारच्या या दडपशाहीचा (repression) विधान परिषदेत (Legislative Council) पर्दाफाश करणार असल्याचा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते (Leader of Opposition ) प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी पत्रकार परिषदेत दिला.

शहरातील गुलोहर विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खा.डॉ.सुभाष भामरे, नंदुरबारच्या खा. डॉ. हीना गावित, जि.प.चे अध्यक्ष तुषार रंधे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, आ. काशिराम पावरा, भाजपचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, माजी आ. राजवर्धन कदमबांडे, महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल, जि.पचे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. दरेकर म्हणाले, की साक्रीतील महिलेच्या मृत्यू प्रकरणी भाजपचे नगरसेवक व पदाधिकार्‍यांना नाहक गोवले जात आहे. या प्रकरणात आघाडी सरकारकडून होत असलेला चुकीचा हस्तक्षेप भाजप कदापि खपवून घेणार नाही. महिलेचा शवविच्छेदन अहवाल येणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे मृत्यूचे कारणही अस्पष्ट आहे. असे असताना खुनासारखा गुन्हा दाखल करून सूड उगवला जात आहे. साक्रीतील पराभव पचनी न पडल्याने आघाडी सरकारच्या पोटात शूळ उठला आहे. आमचे पदाधिकारी अ‍ॅड. गजेंद्र भोसले यांना या महिलेच्या मृत्यू प्रकरणात गोवता येते का, यासाठी सरकारचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. मात्र, पोलिसांनी सरकारच्या दबावाला बळी पडू नये.

अन्यथा सीबीआय चौकशी लावली जाईल, प्रसंगी न्यायालयात दाद मागितली जाईल. नुकतेच भाजपच्या आमदारांच्या निलंबन प्रकरणी न्यायालयाने आघाडी सरकारला चपराक दिली आहे. त्यामुळे आता पुन्हा न्यायालयात जायला भाग पाडू नका. या प्रकरणी पारदर्शक तपास व्हावा, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी पोलिस अधीक्षकांसोबत बैठकही घेतली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दबावाला बळी न पडता निपक्षपातीपणे चौकशी करा

साक्रीतील नगरपंचायत निवडणूक निकालाच्या दिवशी महिलेचा मृत्यू झाल्याने याप्रकरणाला राजकीय रंग देण्यात येत आहे. पोलिसांच्या चौकशीत कुठलाही हस्तक्षेप करणार नाही, मात्र पोलिसांनी कुठल्याही दबावाला बळी पडून नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास थेट अधिवेशनात जाब विचारू, अशी सुचनाही विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली.

साक्रीतील घटनेनंतर माहिती जाणून घेण्यासाठी आज विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे धुळ्यात आले असून त्यांनी सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात भेट दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्याच दालनात चर्चाही झाली. यावेळी भाजपचे खा.डॉ.सुभाष भामरे, जि.प.अध्यक्ष तुषार रंधे, प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी,खा. डॉ. हिना गावीत, भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल, आ.काशिराम पावरा, माजी जि.प.अध्यक्ष शिवाजीराव दहिते आदी उपस्थित होते.

त्यांना जागे करता येत नाही

जिल्हा नियोजन मंडळावर समिती अद्याप गठित करण्यात आलेले नाही. यावर श्री. दरेकर म्हणाले, की झोपलेलेल्यांना जागे करता येते परंतु, झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे करता येत नाही. मात्र, या संदर्भातही अधिवेशनात सरकारला जाब विचारू, असेही त्यांनी सांगितले.

जाणूनबुजून निधी ठेवला अखर्चिक

आदिवासी विकासासाठी केंद्राकडून आलेला 358 कोटींचा निधी राज्य सरकारकडे अखर्चिक पडून आहे. शिवाय इतर विभागांसाठी केंद्राकडून आलेला निधीही आघाडी सरकारने खर्च केला नाही. केंद्राला श्रेय जाऊ नये म्हणून जाणूनबुजून हा निधी अखर्चिक ठेवण्यात आल्याचा आरोपही श्री. दरेकर यांनी केला. तसेच याप्रश्नी खासदारांनी चौकशीची मागणी केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com