तरच मिळेल महाराष्ट्र ‘एन्ट्री’

उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांची माहिती
तरच मिळेल महाराष्ट्र ‘एन्ट्री’

धुळे । Dhule प्रतिनिधी

कोरोना विषाणूचा Corona virus प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात state of Maharashtra प्रवेश करताना When entering लसीचे vaccines दोन्ही डोस पूर्ण झालेले असावेत किंवा त्यांच्याकडे 72 तास पूर्ण न झालेला आरटीपीसीआर RTPCR test चाचणीचा अहवाल असणे अनिवार्य आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल कदम Sub-Regional Transport Officer Rahul Kadam यांनी प्रसिध्दीस पत्रकान्वये कळविले आहे.

साथरोग आजार कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार राज्य शासनाने राज्यात कोविड- 19 चा साथरोग आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना व खबरदारीचे निर्देश दिले आहेत. सद्य:स्थितीत कोरोना विषाणूचा नवीन प्रकार ओमयक्रॉनचे नवीन रुग्ण राज्यात वाढीस लागण्याची शक्यता असल्याने विविध सूचना देण्यात आल्या आहेत. त्यात म्हटले आहे, ज्या लोकांचे लसीचे दोन्ही डोस झालेले आहेत त्यांनाच सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करता येईल. राज्य शासन व केंद्र सरकारतर्फे जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना व कोरोना विषाणूच्या नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास टॅक्सी, खासगी वाहने, खासगी प्रवासी बस अथवा बसमधील व्यक्तींना पाचशे रुपये दंड असेल. प्रवास करतारना मास्क वापरणे बंधनकारक आहे. प्रवासादरम्यान किमान सहा फुटांचे सामायिक अंतर ठेवावे. ड्रायव्हर, हेल्पर, कंडक्टर यांना सुध्दा पाचशे रुपये दंड असेल.

ट्रान्सपोर्ट एजन्सीचे खासगी प्रवासी बसच्या मालकांना दहा हजार रुपये दंड असेल. वरील प्रकारचे उल्लंघन वारंवार होत असेल, तर त्यांची अनुज्ञप्तीची मान्यता रद्द करण्याबाबत कारवाई करण्यात येणार आहे अथवा जोपर्यंत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असेल तोपर्यंत अनुज्ञप्ती निलंबित करण्यात येईल. या पार्श्वभूमीवर सर्व प्रवासी वाहन मालक, चालकांनी नियमांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com