जिल्ह्यातील धरणांमध्ये 31 टक्केच जलसाठा

जिल्ह्यातील धरणांमध्ये 31 टक्केच जलसाठा

धुळे । Dhule प्रतिनिधी

जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून उन्हाची तीव्रता (intensity of the sun) प्रचंड वाढली आहे. त्यामुळे प्रकल्पांमधील पाण्याचे वेगात बाष्पीभवन होत जलसाठ्यात घट (Decrease in water storage) होत आहे. सद्यःस्थितीत मध्यम आणि लघु प्रकल्पात केवळ 31.63 टक्के जलसाठा उरला आहे. त्यामुळे आगामी काळात काही गावांमध्ये टंचाई (Feeling scarce)जाणवण्याची शक्यता असून प्रत्येकाने पाण्याचा( water) काटकसरीने वापर करण्याची गरज आहे.

जिल्ह्यात गेल्या वर्षी पावसाने सरासरी ओलांडली (Rainfall exceeded average) असली तरी जिल्ह्यातील काही भागात आता टंचाई (Scarcity) जाणवण्यास सुरुवात झाली आहे. गेल्यावर्षी झालेल्या पावसामुळे मध्यम प्रकल्पांत 60 तर लघु प्रकल्पात 93 टक्के जलसाठा झाला होता. पाण्याचा सिंचनासाठी वापर झाल्याने मार्च महिन्याच्या सुरूवातीला 50 टक्के जलसाठा शिल्लक होता. पंरतू 18 मार्चनंतर तापमानात प्रचंड वाढ होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे बाष्पीभवनाचा (Evaporation) वेग वाढल्याने जलसाठा कमी (Decreased water storage) झाला. आता मध्यम आणि लघु 31.63 टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी या कालावधीत तो 35.41 टक्के होता. लघु प्रकल्पांत आता केवळ 27.4 टक्के तर मध्यम प्रकल्पांत 33.13 टक्के जलसाठा आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे.

डोमकानी येथे टँकर सुरू-

जलसाठ्यात घट होत असल्यामुळे आता काही गावांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. डोमकानी (ता.साक्री) गावात टँकर (Tanker) सुरू करण्यात आले असून त्याव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच साक्री व शिंदखेडा या दोन तालुक्यातील 49 गावांत विहीर अधिग्रहणाचा (Well acquisition) प्रस्ताव प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे.

जिल्ह्यात गेल्या वर्षी साक्री तालुक्यात सुरुवातीला पावसाने पाठ फिरवली. शेवटच्या टप्प्यात पावसाने हजेरी लावली असली तरी पाहिजे त्या प्रमाणावर पाऊस न झाल्याने नदीनाल्यांना फारसा पूर आला नाही. तसेच विहिरीच्या पाणीपातळीही वाढ झाली नाही. त्यामुळे यंदा तालुक्यात टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. साक्री तालुक्यातील डोमकानी गावात गेल्या महिन्यापासून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच इतरही अनेक गावात पाणीटंचाईची समस्या निर्माण झालेली आहे.

पाण्याचे स्रोत (Water sources) आटल्याने गावांना नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. साक्री तालुक्यातील 36 गावातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहे. शिंदखेडा तालुक्यात काही गावांना पाणीटंचाईची समस्या (problem of water scarcity) जाणवत आहे. शिंदखेडा तालुक्यात दरवर्षी साहूर गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, यंदा साहूरला पाणीटंचाईची समस्या जाणवली नाही. याठिकाणी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, काही गावात पाणीटंचाई जाणवत असल्याने तालुक्यातील तेरा गावात विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव आहे. त्याबाबत लवकरच निर्णय होऊन विहीर अधिग्रहण केल्या जातील, अशी माहिती जि.प.च्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.

नकाणेत केवळ 37 टक्के जलसाठा-

धुळे शहरात नकाणे, डेडरगाव व तापी योजनेवरून पाणी पुरवठा केला जातो. त्यात नकाणे तलावात आता केवळ 37.88 टक्के जलसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी तो 53.9 टक्के होता. सुलवाडे बॅरेजमध्ये क्षमतेच्या तुलनेत 42.1 टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी तो 44.37 टक्के जलसाठा होता.

टँकरचे आठ प्रस्ताव-

जिल्ह्यात यंदा उन्हाची तीव्रता प्रचंडा आहे. त्यामुळे जलसाठ्यांमध्ये घट होत असून आता टँकरचीही मागणी वाढली आहे. नव्याने 8 गावात टँकर सुरू करण्यासाठी महसूल प्रशासनाकडे प्रस्ताव दाखल झाले आहे.दरम्यान सन 2020 आणि 2021 या दोन वर्षात टँकर सुरू करावे लागले नव्हते.

‘या’ गावात होणार विहिरींचे अधिग्रहण

साक्री तालुक्यातील इसर्डे, कोडे, कालटेक, पंचाळे, शेेणपूर, पळासखेडे,सिनवन, तोरसपाडा, देखणीपाडा, विटाई, साखरबर्डी, आंबापाडा, मिलखडी, कंजरफळी, बांगारपाडा, धडकेलपाडा, शेवडीपाडा,ब्राह्मणवेल, मांगरवाडी, हारंबपाडा, अंबादर, उभर्‍यामाळ, आंचूर, पांगण, परीपाडा, केतकपाडा, देवडोंगरपाडा, जामझिरा, शिरसोले, चारणकुडी, जामखेल, पन्हाळीपाडा, पाडसोडा, धुरीविहीर, टेभे प्र.भामेर,धनेर, मोगारपाडा या गावात तर शिंदखेडा तालुक्यात चुडाणे, रुदाणे, खर्दे बु., कर्ले, जोगशेलू, मांडळ, अंजनविहिरे, सवाईविहिरे, सवाई मुकटी, चौगाव बु., खलाणे, सोनशेलू, दरखेडा, अलाणे आदी गावांत विहीर अधिग्रहण होणार आहे.

Related Stories

No stories found.