इंदूरच्या प्रवाशाला लुटणार्‍या चोरट्यास एक वर्ष सश्रम कारावास

इंदूरच्या प्रवाशाला लुटणार्‍या चोरट्यास एक वर्ष सश्रम कारावास

धुळे - प्रतिनिधी dhule

शहरातील चाळीसगाव (chalisgaon) रोड चौफुलीवरपाच वर्षापुर्वी इंदूरच्या (Indore) प्रवाशाला (passenger) लुटणार्‍या वसीम वड्याला न्यायालयाने एक वर्ष सश्रम कारावास आणि 1 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

इंदूरच्या प्रवाशाला लुटणार्‍या चोरट्यास एक वर्ष सश्रम कारावास
एलसीबीची दुहेरी कामगिरी ; गुंगीकारक औषधांसह दोघे जेरबंद
इंदूरच्या प्रवाशाला लुटणार्‍या चोरट्यास एक वर्ष सश्रम कारावास
एलसीबीची दुहेरी कामगिरी ; गुंगीकारक औषधांसह दोघे जेरबंद

विशेष म्हणजे चाळीसगाव रोड पोलिसांनी या गुन्ह्यातील मुद्येमाल शंभर टक्के रिकव्हरी केला. जलदगती तपास करीत चार दिवसात दोषारोपपत्रही न्यायालयात दाखल केले होते.

इंदूर येथे राहणारे शब्बीर हुसेन हैदर अली कप्तान यांना दि. 18 मार्च 2018 रोजी मध्यरात्री चाळीसगाव रोड चौफुलीवर वसीम उर्फ वसीम वड्या सलीम रंगारी (रा शब्बीर नगर, दोन हजार प्लॉट, धुळे) याने लुटले होते.

त्यांच्याकडील ब्रेसलेट, सोन्याच्या बांगड्या, सोन्याच्या अंगठ्या, सोन्याच्या इयररिंग, सोन्याचा कॉइन, लेडीज मनगटी घड्याळ व आयटीएस स्मार्ट कार्ड असा एकुण 1 लाख 97 हजार रुपये किंमतीचा मुद्येमाल जबरीने लुटून नेला होता. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास पीएसआय सागर आहेर यांच्याकडे होता. त्यांनी तपासाचे चक्र फिरवित पोकॉ प्रेमराज पाटील, जोएब पठाण, सुशील शेंडे व सोमनाथ चौरे यांच्यासह काही तासातच आरोपी निष्पन्न करीत गुन्ह्याचा छडा लावला. वसीम वड्या यास ताब्यात घेत त्याच्याकडून गुन्ह्यातील शंभर टक्के मुद्येमाल रिकव्हर केला. जलद गतीने तपास करून चार दिवसांच्या आतच गुन्ह्याचे दोषारोपपत्र सादर केले.

न्यायालयाने साक्षीदारांची साक्ष आणि सरकारी वकीलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून गुन्ह्यातील आरोपी वसीम वड्या यास एक वर्ष सश्रम कारावास तसेच 1 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अ‍ॅड. राकेश चौधरी यांनी कामकाज पाहिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com