
धुळे - Dhule - प्रतिनिधी :
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग जवळील गायत्री प्लास्टिकच्या गोदामावर महापालिकेच्या पथकाने छापा टाकून एक टन प्लास्टीक माल जप्त केला व 25 हजाराचा दंड ठोठावला.
स्वच्छ सर्वेक्षण 2021 आणि माझी वसुंधरा अभियान अंतर्गत प्लास्टिक बंदीच्या प्रभावी अंमबजावणीसाठी आयुक्त अजीज शेख यांच्या आदेशावरून आज वासवा टायर जवळ गायत्री प्लास्टिक मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग जवळील गोदामावर कारवाई करण्यात आली.
या कारवाई दरम्यान 25 हजारांचा दंड करण्यात आला. सुमारे 1 टन प्लास्टीक माल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई उपायुक्त श्री. गोसावी, सहा.आयुक्त श्री. कोते, सहा.आरोग्याधिकारी लक्ष्मण पाटील, स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, संदीप मोरे, विकास साळवे, महेंद्र ठाकरे, अनिल जावडेकर, मुकादम शशिकांत जाधव, रुपेश पवार, श्रीनाथ देशपांडे यांच्या पथकाने केली.