
धुळे-प्रतिनिधी dhule
शहरातील साक्री रोड परिसरातील कुमार नगर भागात दहशत माजविणारा चिनु पोपली यांची गोळ्या घालुन हत्या करण्यात आली. मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
घटनेमुळे शहारात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोन संशयित आरोपीना ताब्यात घेतले आहे. तर एक संशयित आरोपी फरार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पैशाच्या आर्थिक व्यवहारातून ही हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे.