मध्यप्रदेशातील सराईत गुन्हेगार्‍यांच्या टोळीतील एकाला अटक - एलसीबीची कामगिरी

मध्यप्रदेशातील सराईत गुन्हेगार्‍यांच्या टोळीतील एकाला अटक - एलसीबीची कामगिरी

धुळे - प्रतिनिधी dhule

(mp) मध्यप्रदेश राज्यातील सराईत गुन्हेगार्‍यांच्या टोळीतील एकाला (lcb) एलसीबीच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्याने चौघा साथीदारांसह शिरपूर (shirpur) तालुक्यातील तांडे शिवारातील कंपनीतून कॉपर कॉईल चोरीची कबुली दिली आहे.

मध्यप्रदेशातील सराईत गुन्हेगार्‍यांच्या टोळीतील एकाला अटक - एलसीबीची कामगिरी
Photo Gallery : ‘मै थुकेगा नही’..., बाहुबली की नही तो झाडुबली की जरूरत है!

शिरपूर तालुक्यातील तांडे शिवारातील (Mahakot Fiber Company) महाकॉट फायबर कंपनीतील ट्रान्सफार्मर (Transformer) मधील 930 किलोच्या तीन कॉपर कॉईल व पॉवर ऑईल असा सव्वा तीन लाखांचा मुद्येमाल चोरट्यांनी लंपास केला होता. ही चोरीची घटना दि.26 ते 27 फेब्रुवारीदरम्यान घडली होती.

याबाबत कंपनीचे मॅनेजर संतोष पाटील यांच्या फिर्यादीवरून थाळेनर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडुन सुरु असतांना हा गुन्हा देवास (मध्यप्रदेश) येथील रवी ऊर्फ लालु देवोलाल फुलेरी या सराईत गुन्हेगाराने व त्याचे टोळीने केला असल्याची खात्रीशीर माहिती पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली.

त्यनुसार एलसीबीच्या पथकाने लालु फुलेरी याला काल रोजी देवास येथुन ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हा गुन्हा त्याच्या इतर चार साथीदारांसह केला असल्याची कबुली दिली. आरोपीला पुढील तपाससाठी थाळनेर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्याची कारवाई सुरु आहे.

ही कामगिरी (Superintendent of Police Pravin Kumar Patil) पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव (Upper Superintendent of Police Prashant Bachhav) यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, पोसई योगेश राऊत, पोहेकॉ रफिक पठाण, प्रकाश सोनार, संदीप सरग, पोना गौतम सपकाळे, पोना राहुल सानप, कमलेश सूर्यवंशी यांच्या पथकाने केली आहे.

Related Stories

No stories found.