दुचाकीस्वाराकडून एक लाखांचा गुटखा जप्त

शिरपूर शहर पोलिसांचे मिशन ऑलआऊट
दुचाकीस्वाराकडून एक लाखांचा गुटखा जप्त

धुळे ।Dhule । प्रतिनिधी

शिरपूर शहर पोलिसांनी (City police) मिशन ऑलआऊट (Mission Allout) दरम्यान नाकाबंदी करून गुटख्याची चोरटी वाहतूक (Gutkha smuggling) रोखली. दुचाकीस्वाराला (cyclist) ताब्यात घेत त्याच्याकडून एक लाखांचा गुटखा (Gutkha) व 30 हजाराची दुचाकी असा एकुण 1 लाख 30 हजारांचा मुद्येमाल जप्त (Seizure of goods) केला.

पोलिस निरीक्षक रविंद्र देशमुख, सपोनि गणेश फड, पोकॉ अमित रनमळे, स्वप्निल बांगर, सनी सरदार, रवि महाले यांच्या पथकाने मध्यरात्री करवंद नाका येथे ऑल आऊट (Mission Allout) दरम्यान नाकाबंदी (Blockade) करुन संशयीत वाहनांची तपासणी सुरू केली. तेव्हा एक वाजेच्या सुमारास एका संशयीत दुचाकीस्वाराला (क्र.एमपी 46 एमएच 9823) पकडण्यात आले.

त्यांच्याकडील पिशव्यांची तपासणी केली असता त्यात गुटखा (Gutkha) आढळून आला. पंकज दिलीप पवार (वय 25 रा.महाविर लॉन्स, करवंद रोड, शिरपुर) असे त्याने त्याचे नाव सांगितले. त्यांच्याकडून एकुण 1 लाख 620 रुपये किंमतीचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला व मानवी शरीरावर अपायकारक असलेला विमल पान मसाला व व्ही 1 तंबाखूचा साठा व 30 हजारांची दुचाकी (Two-wheeler) जप्त करण्यात आली.

Related Stories

No stories found.