पुतण्याने केला काकाचा खून ; २४ तासात लागला तपास

पुतण्याने केला काकाचा खून ; २४ तासात लागला तपास

धुळे - प्रतिनिधी dhule

तालुक्यातील अंबोडे येथील (Murder) खूनाचा गुन्हा (police) पोलिसांनी 24 तासात उघडकीस आणला. रणाईचेतांडा येथून मयताच्या पुतण्याला अटक करण्यात आली असून त्याने अनैतिक संबंधाच्या कारणावरून काकाचा खून केल्याची कबुली दिली.

पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील (Superintendent of Police Pravin Kumar Patil) यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. दि.2 जुन रोजी अंबोडे शिवारात एक अनोळखी पुरुष इसमाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत मिळून आले होता. त्यावरून मयताची ओळख पटविण्यात आली. ज्ञानेश्‍वर रामभाऊ राठोड (वय 25 रा.रणाईचे तांडा ता. अमळनेर) असे त्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या पोटावर, पाठीवर, तोंडावर तिक्ष्ण हत्याराचे वार करण्यात आले होते.

त्यावरून अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून त्याचा खून केल्याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने माहिती काढून मयताचा पुतण्या जगदीश बबलु राठोड (रा.रणाईचे तांडा) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अनैतिक संबंधाचे कारणावरून त्याने मयतास रणाईचे तांडा येथून मोटार सायकलवर घेवून अंबोडे शिवारात निर्जनस्थळी घेवून आला. तेथे त्यांच्यावर चाकूने वार करत त्याचा खून केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव (Upper Superintendent of Police Prashant Bachhav), उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस ठाण्याचे उप निरीक्षक अनिल महाजन, सागर काळे, असई सुनिल विंचुरकर, पोहेकॉ प्रविण पाटील, पोहेकॉ सोमनाथ कांबळे, पोना योगेश पाटील, पोकॉ प्रमोद पाटील, धिरज सांगळे, कुणाल शिंगाणे, नितीन दिवसे, कांतीलाल शिरसाठ, राकेश मोरे, योगेश पाटील, विशाल गुरव यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com