घरफोडी प्रकरणी एकास अटक

घरफोडी प्रकरणी एकास अटक

धुळे Dhule । प्रतिनिधी

शहरातील पन्नासखोली शांतीनगर (Fifty room Shantinagar) परिसरातील घरफोडीचा उलगडा (Burglary explained) चाळीसगाव रोड पेालिसांनी (Chalisgaon Road Police) अवघ्या तीन दिवसात केला आहे. या प्रकरणी तिरंगा चौकातील एकाला ताब्यात (Detain one) घेवून त्याच्याकडून पंधरा हजाराची रोकडही पोलिसांनी हस्तगत केली आहे.

अरुण श्रीधर केले (वय 70) या मसाला विक्रेत्याचे घर दि.11 ते 14 च्या दरम्यान चोरट्यांनी फोडले होेते. 41 हजारांची रोकड आणि 10 ग्रॅम वजनाची सोन्याची माळ चोरट्यानेे चोरुन नेली होती. गुन्ह्याचा तपास करत असताना एपीआय संदीप पाटील यांना घरफोडीतील आरोपीचा क्ल्यू मिळाला.

तिरंगा चौकात मिनाज मोहम्मद रमजान अन्सारी याने ही चोरी केल्याचे कळल्यानंतर त्याला पीएसआय विनोद पवारसह शोध पथकाने ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता पाच हजाराची रोकड मिळून आली. त्याने गुन्ह्यातील आणखी 10 हजाराची रोकडही काढून दिली. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com