बचत गटाच्या महिलांना साडेसहा लाखांत गंडा, एकीवर गुन्हा

बचत गटाच्या महिलांना साडेसहा लाखांत गंडा, एकीवर गुन्हा

धुळे । Dhule । प्रतिनिधी

येथील बचत गटातील (self-help group) महिलांची (women) कर्जाची रक्कम (Loan amount) रोख स्वरूपात स्विकारून ती त्यांना परत न करता (Without returning) त्यांची साडेसहा लाखात फसवणूक (Cheating) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शहर पोलिसात बचत गटाच्या सहयोगिनी नयना देवरेवर (Nayana Deore) गुन्हा (Crime against) दाखल झाला आहे.

शहरातील साक्री रोडवरील शितल हौसिंग सोसायटीत (Shital Housing Society) राहणार्‍या भावना नितीन सुर्यवंशी (वय 44) यांनी याबाबत धुळे शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दि. 6 ऑक्टोबर 2019 ते दि. 8 जानेवारी 2022 दरम्यान सौ. नयना भाऊसाहेब देवरे (Nayana Deore) हिने महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना विश्वासात घेतले. वेळोवेळी पैशांची अडचण असल्याची विविध कारणे सांगून कर्ज (Loan) काढण्यास भाग पाडले.

अगोदर कमी रक्कमेचे कर्ज तिने फेडून महिलांना विश्वास संपादन करूननंतर मोठ्या रक्कमेचे कर्ज (Loan) काढण्यास सांगून त्या कर्जाची रक्कम तिने संबंधीत महिलांकडून रोख स्वरूपात स्विकारून अद्यापपर्यंत सुर्यवंशी यांच्यासह बचत गटातील (self-help group) महिलांपैकी कोणालाही रक्कम परत न करता 6 लाख 42 हजार 204 रूपयांची आर्थिक फसवूणक (Financial fraud) केली. तपास असई ठाकरे करीत आहेत.

Related Stories

No stories found.