लक्ष्मी पूजनाच्या पुर्वसंध्येला बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी

लक्ष्मी पूजनाच्या पुर्वसंध्येला बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी

धुळे dhule । प्रतिनिधी

साडेतीन मुहूर्तापैकी (three and a half muhurtas) एक असलेल्या लक्ष्मी पुजनच्या (Lakshmi Pujan) पुर्वसंध्येला बाजारपेठेत गजबजली (market was crowded) होती. हिंदू धर्मातील सर्वात मोठा मानल्या जाणार्‍या दीपोत्सवाला (Deepotsava) वसुबारसनंतर (Vasubaras) सुरुवात झाली. धनत्रयोदशीला (Dhantrayodashi) साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त साधत ग्राहकांनी (customers) सोने खरेदीला (buy gold) पसंती दिली. बाजारपेठेत सोन्या-चांदींच्या वस्तूंना या कालावधीत विशेष मागणी होती.

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या लक्ष्मी पुजनच्या पुर्वसंध्येला बाजारपेठ गजबजली होती. ग्राहकांनी खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली होती. सोने-चांदी याबरोबरच अनेक चैनीच्या वस्तूंचे दुकाने सजविण्यात आल्या आहेत. वाढती मागणी लक्षात घेता व्यावसायिकांनी अत्याधुनिक मोबाईल सवलतीच्या विक्रीसाठी दाखल केले आहेत.

धनत्रयोदशीपासून लक्ष्मी पूजनापर्यंत बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. काही व्यावसायीकांनी आग्रारोडवर हंगामी दुकाने थाटली आहे. लक्ष्मीपूजनामुळे बाजारपेठेत गर्दी झाली होती. आग्रारोड बॅरेकेटस् लावून बंद करण्यात आला होता. त्यामुळे वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली होती. लक्ष्मी मूर्ती, पुजेचे साहित्य, वह्या, केरसुनी, नारळ खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती. दसर्‍याला झेंडूची 90 रुपये किलो दराने बाजारपेठेत विक्रीस होती. परंतु दीपोत्सवात झेंडू फुले 50 ते 60 रुपये किलो दराने बाजारात उपलब्ध होती.

अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी दीपोत्सवात दीप पूजनाला महत्व आहे. तर दीपोत्सव आणि रांगोळी हे एक समिकरण तयार झाले आहे. विविध रंगाच्या रांगोळ्या, रंगीबेरंगी पणत्या, प्लॉस्कीटची आकर्षक फुलांची तोरणे तसेच हार, पूजेसाठी लागणार्‍या लाह्या, बत्तासे आदी खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत आज गर्दी झाली होती.

लक्ष्मी पूजनला व्यापारी वहीपूजन करतात. त्यामुळे वह्या व खतावणी खरेदीसाठी देखील गर्दी झालेली दिसून आली. नारळ व अन्य पूजेचे साहित्य विक्रेत्यांनीही ठिकठिकाणी दुकाने थाटली होती. बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेवून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आग्रारोड, पारोळा रोडवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सराफ बाजारात कोट्यावधींची उलाढाल

दीपोत्सवात सोने खरेदी करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे धनत्रयोदशीला काहींनी सोने खरेदीचा मुहूर्त साधला तर आता लक्ष्मी पूजनच्या पुर्वसंध्येलाही सराफ बाजारात गर्दी दिसून आली. सोन्याची अंगठी, कानातले टॉप्स, हार आदींसह देवांच्या मूर्ती खरेदी करण्यावर ग्राहकांनी भर दिला. सराफ बाजारात नवचैतन्य दिसून आले. गेल्या दोन दिवसात सराफ बाजारात कोट्यावधींची उलाढाल झाली असल्याचे सांगण्यात आले. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा सोने खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला.

बाजारपेठेत आकर्षक लक्ष्मी मूर्ती

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या लक्ष्मी पूजनला घरोघरी लक्ष्मी मातेची आराधना केली जाते. त्यासाठी लक्ष्मीची मूर्ती खरेदी करण्यात येते. बाजारपेठेत आकर्षक अशा लक्ष्मी मूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. 70 रुपयांपासून एक हजार रुपयापर्यंत मूर्ती बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. काही जण सोने व चांदीच्या लक्ष्मीची मूर्ती देखील खरेदी करतात त्यामुळे सराफ बाजारातही लक्ष्मीची मूर्ती खरेदी करण्यासाठी आज गर्दी दिसून आली.

झेंडू फुलांच्या दरात घट

यंदा झेंडूंच्या फुलांची आवक वाढली असून दसर्‍याला 80 रुपये किलो दराने झेंडूंच्या फुलांची विक्री झाली होती. परंतू आता लक्ष्मी पूजनच्या पुर्वसंध्येला 50 ते 60 रुपये किलोदराने फुलांची विक्री झाली. झेंडूंच्या फुल विक्रेत्यांनी शहरात विविध ठिकाणी दुकाने थाटली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com