दसर्‍याच्या पुर्वसंध्येला बाजारपेठ गजबली

दसर्‍याच्या पुर्वसंध्येला बाजारपेठ गजबली

धुळे Dhule । । प्रतिनिधी

साडेतीन मुर्हूतापैकी एक असलेल्या दसर्‍याला (Dasarya) धुळ्यातील (Dhule) बाजारपेठ (Market) गजबजली होती. सराफ बाजारातही खरेदीसाठी गर्दी झालेली दिसून आली.

दसरानिमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झालेली दिसून आली. फुले विके्रत्यांनी शहरात ठिकठिकाणी दुकाने थाटली होती. झेंडूची फुले 100 ते 150 रूपये तर शेवंतीची फुले 300 रूपये किलो दराने विकली गेली. तर ऊस व आपट्यांची पाने विक्रेत्यांनी दसर्‍याच्या पुर्वसंध्येला दुकाने लावली होती.

सराफ दुकानांवरही खरेदीसाठी गर्दी झाल्याचे दिसून आले. तसेच इलेट्रॉनिक वस्तूही खरेदीवर काहींनी भर दिला.

नवमीनिमित्त खानदेश कुलस्वामिनी एकविरा देवी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. तर दसर्‍याच्या दुसर्‍या दिवशी एकादशीला बालाजी रथ मिरवणूक काढली जाते. परंतु यंदा कोरोना महामारीमुळे रथ मिरवणूकीला परवानगी न दिल्यामुळे रथ फक्त पाच पावले काढण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.