सेवा निवृत्तीच्या दिवशीच गटविकास अधिकाऱ्यांसह दोघे एसीबीच्या जाळ्यात

सेवा निवृत्तीच्या दिवशीच गटविकास अधिकाऱ्यांसह दोघे एसीबीच्या जाळ्यात

धुळे Dhule

भविष्य निर्वाह निधीच्या (Provident Fund) जमा रक्कमेतुन ना परतावा अग्रीम मंजुर (Advance approved) होण्यासाठी पाच हजारांची लाच (Bribe) घेणारे शिरपूर पंचायत समितीचे गटविकास (Shirpur Panchayat Samiti) अधिकारी सेवानिवृत्तीच्या (Group Development Officer) दिवशी एसीबीच्या (ACB) जाळ्यात अडकले. लाच स्वीकारतांना त्यांच्यासह सहाय्यक लेखाधिकाऱ्याला (Assistant Accounts Officer) रंगेहात पकडण्यात (Caught) आले. दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हाडाखेड (ता. शिरपूर) येथील जि.प. शाळेत (Z.P. At school) प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत असलेले तक्रारदार यांनी घराच्या दुरुस्तीसाठी भविष्य निर्वाह निधीचा (Provident Fund) जमा रक्कमेतुन ना परतावा ५ लाख रुपये अग्रीम मिळणे करीता गटविकास अधिकारी,(Group Development Officer) पंचायत समिती, शिरपूर यांचे नावे अर्ज केला होता. सदर ना परतावा अग्रीम मंजुर होण्याकरीता त्यांनी गटविकास अधिकारी

युवराज शिंदे यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी तक्रारदाराकडे त्यांचे भविष्य निर्वाह निधीतुन ना परतावा अग्रीम मंजुर करण्यासाठी ५ हजार रुपये लाचेची मागणी (Demand for bribe) केली. याबाबत त्यांनी काल दि.३० रोजी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार एसीबीच्या (ACB) पथकाने पडताळणी केली.

आज दि.३१ रोजी पंचायत समिती, शिरपूर येथे सापळा लावला असता गटविकास अधिकारी (Group Development Officer) युवराज दलाल शिंदे (Yuvraj Dalal Shinde) (वय-५८) यांनी सहाय्यक लेखा अधिकारी (Assistant Accounts Officer) चुनिलाल गोपीचंद देवरे (Chunilal Gopichand Deore) यांच्या हस्ते पाच हजारांची लाचेची रक्कम स्विकारली. लाचेची रक्कम स्विकारल्यानंतर त्यांना रंगेहात पकडण्यात आले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे (Bribery Prevention Dhule Division) पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, राजन कदम, कृष्णकांत वाडीले, भुषण खलाणेकर, प्रशांत चौधरी, भुषण शेटे, कैलास जोहरे, शरद काटके, महेश मोरे, संतोष पावरा, संदीप कदम, सुधीर मोरे व जगदिश बडगुजर यांनी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com