पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार : तरूणाला अटक

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीवर
अत्याचार : तरूणाला अटक

धुळे ।Dhule । प्रतिनिधी

शपथ देवून पळवून नेलेल्या (Kidnapped) धमनार येथील अल्पवयीन मुलीवर (minor girl) जबरीने अत्याचार (Tyranny) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तरूणाला ताब्यात घेतले असून गुन्ह्यात वाढीव कलम लावण्यात आले आहे.

याबाबत धमनार (ता. साक्री) येथे राहणार्‍या पीडित 15 वर्षीय मुलीच्या वडिलांनी साक्री पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दि. 13 एप्रिल रोजी रात्री त्यांच्या मुलीला गावातील जगदीश युवराज मोरे (Jagdish Yuvraj More) (वय 22) याने मी मरून जाईल, अशी शपथ देवून पळवून नेले. त्यानंतर दुचाकीवर बसवून मालेगाव येथे नेले. मालेगाव ते मनमाड दरम्यान प्रेरणा लॉजमध्ये (Inspiration Lodge) लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी जबरदस्तीने शारिरीक संबंध (Tyranny) केले. त्यानंतर दि. 25 रोजी संगमनेर येथे थांबून वेळोवेळी पीडितेवर अत्याचार केले. त्यानुसार या अपहरणाच्या (Kidnapped) गुन्ह्यात भादंवि 366, 376 (2), (एन), 506 सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधि. कलम 4, 5 (ल) प्रमाणे वाढील कलम लावण्यात आले आहे. पोलिसांनी तरूणाला ताब्यात घेतले आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.

Related Stories

No stories found.