नागरिक रस्त्यावर, पोलीस अधिकार्‍याला घेराव

शिंदखेडा पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
नागरिक रस्त्यावर, पोलीस अधिकार्‍याला घेराव

शिंदखेडा Shindkheda । प्रतिनिधी

शिंदखेडा शहरातील पोलिसांच्या (police) कार्यप्रणालीवर प्रश्न (Questions on the working) निर्माण करुन नागरीक (Citizens) रस्त्यावर (streets) उतरले व पोलिस अधिकार्‍याला घेराव (Surround the officer) घातला. याबाबत दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांना घेराव घालून पदाधिकार्‍यांनी दोन दिवसात कार्यवाही न झाल्यास शहरासह जिल्ह्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी जयवंतराव पाटील, नगरपंचायत विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, नगरसेवक उदय देसले, अरुण देसले, दीपक अहिरे, अशोक बोरसे, व्यापारी असोसिएशनचे बाळकृष्ण बोरसे, मोहन परदेशी, संजय पाटील, शिवसेना शहरप्रमुख संतोष देसले, तालुका समन्वयक विनायक पवार, विधानसभा क्षेत्र प्रमुख गणेश परदेशी, नंदकिशोर पाटील, पिक संरक्षण सोसायटीचे चेअरमन नाना चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण पाटील, गोलु देसले, चेतन देसले, निलेश देसले, गजेंद्र गिरासे, प्रकाश पाटील, विशाल वाघ, तुषार देसले, चेतन भामरे, कुणाल गुरव, नितीन गुरव यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिंदखेडा शहर हे शांतताप्रिय शहर म्हणून ओळखले जात होते. आता मात्र ते क्राईमच्या बाबतीत अग्रेसर होत आहे. गेल्या तीन ते चार वर्षात गुन्हेगारी मोठी वाढली असून घरफोडी, चोरी यांचे प्रमाण वाढले आहे. स्त्रियांना त्रास देणे, त्यांच्या अंगावरील दागिने ओरबाडून पलायन करणे, काही ठिकाणी वृद्धांना त्रास देणे, घरावर दगडफेक करणे, शिवीगाळ करणे आदी उपद्रवात वाढ झालेली आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रार केली जात नव्हती. त्यामुळे गुन्हेगारांना संधी मिळाली. गेल्या वर्षी शहरातील एका पत्रकारावर जीवघेणा हल्ला झाला.

सध्या पोलिसांची कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. मुख्यालयाला न राहणे, गावातील माहिती न घेणे, गाडीतून पेट्रोलिंग करणे, पेट्रोलींग वाहनातून करीत जातांना कॉलनी परिसराकडे दुर्लक्ष करणे, गाडी थांबवून साधी चौकशी देखील केली जात नाही. गेल्या काही काळात जिल्हा पोलिस अधीक्षक येऊन गेले त्यांनी पोलीस व जनता यांचा संवाद असला पाहिजे यासाठी प्रयत्न केले होते. त्यास चांगला प्रतिसादही मिळाला होता. मात्र सध्या याचा आभाव दिसून येत आहे.

शिंदखेडा पोलीस ठाण्याचे प्रभारी पीआय भाबड हे आहेत. तर पीएसआय गजानन गोटे हे त्यांचे सहाय्यक आहेत. या दोघांनी बर्‍यापैकी गुन्हेगारी व शिस्त यावर प्रभाव टाकला होता. मात्र गोटेंची बदली झाली व मरगळ आली. शिंदखेडा शहर सध्या वेगवेगळ्या बाबतीत चर्चेत आहे. पण पोलिसांना हे माहिती नसते हाही एक महत्वाचा विषय आहे. शहरात लाखो रुपयांचा गुटखा येतो, येथून इतरत्र पोहोच होतो हेही पोलिसांना माहिती आहे किंवा नाही हाही प्रश्नच आहे. तर अमली पदार्थांची विक्री होते. ज्या रस्त्याने पोलीस अधिकारी आपल्या वाहनाने वापरतात त्याच रस्त्यावर अनधिकृत दारू व इतर मद्य विकले जातात. बस स्टॅण्ड परिसरात हे चालते फिरते व्यवसाय होतात. कोणी याबाबत बोलत नाही, तक्रार करायला पुढे येत नाही.

यापूर्वी साधारणपणे 1985 ते 1990 च्या काळात स्व ठाणसिंग जीभाऊ विधानसभा सदस्य असतांना काही वादग्रस्त पीएसआय कार्यरत होते. तेव्हा कार्यकर्त्यांनी पोलिसांना घेराव घालून आंदोलन केले होते. काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन कार्यवाही करण्यात आली होती. जेलभरो आंदोलन झाले होते. त्यानंतर सुमारे 35 वर्षानंतर पोलिसांना घेराव घालण्यात आला.

आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, गुन्हा घडून सुमारे पंधरा दिवसांचा कालावधी उलटला मात्र शिंदखेडा पोलिसांनी अद्यापही कार्यवाही केलेली नाही. तर पीआय सुनील भाबड यांची भेट घेतली असता शोध सुरू आहे, माझ्या कर्तव्यात कोणतीही कसूर करीत नाही, अनेक गुन्ह्यांचे तपास मी लावले आहेत. या बाबतीत माझे तपासकार्य सुरू आहे असे त्यांनी सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी शिंदखेडा पोलीस संख्या वाढवावी, पोलीस निवासस्थाने अद्ययावत बांधावीत जवळच पीआय निवासस्थान असावे पीएसआय निवासस्थान असावे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com