शासकीय कामात अडथळा, तीन वर्ष सश्रम कारावास

शासकीय कामात अडथळा,  तीन वर्ष सश्रम कारावास

धुळे ।Dhule । प्रतिनिधी

शासकीय कामात (government work) अडथळा (Obstruction) निर्माण केल्याप्रकरणी एकास तीन वर्ष सश्रम कारावासाची (Rigorous imprisonment) शिक्षा (punishment) न्यायालयाने (Court) ठोठावली आहे. जिल्हा व सत्र न्यायालय क्र. 7 चे न्यायाधीश व्ही.व्ही. गायकवाड यांनी हा निकाल दिला आहे.

दि. 17 फेब्रुवारी 2018 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास फिर्यादी शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक हनुमंत उगले हे आरोपी राहुल गजानन थोरात व महेश प्रकाश पवार (रा. वाखारकर नगर, धुळे) यांच्याविरूध्द शहर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात साक्ष देण्यासाठी न्यायालयात जात होते. तेव्हा दोघांनी उगले यांना न्यायालयाच्या आवारात अडवून त्यांच्या अंगावर धावून गेले.

साक्ष देवू नये व दोघांना जामिन मिळण्यास मदत करावी म्हणून दोघांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तसेच उगले यांना हातपाय तोडण्याची धमकी दिली. त्यावरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. खटल्याचे कामकाम न्यायाधीश व्ही.व्ही. गायकवाड यांच्या न्यायालयात चालले.

त्यात भांदवि कलम 235 (2) प्रमाणे आरोपी महेश प्रकाश पवार यास दोषी धरून भादंवि कलम 535 मध्ये तीन वर्ष सश्रम कारावास, भादंवि कलम 186 मध्ये एक महिना सश्रम कारावास, भादंवि कलम 506 मध्ये 4 सश्रम कारावास, अशी शिक्षा ठोठावली आहे. सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. वैभव पुरोहित यांनी कामकाज पाहिले. तर पैरवी अधिकारी म्हणून पोहेकाँ बी.व्ही.जाधव, पोकाँ पी.आर.राठोड यांनी काम पाहिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com