आता सर्व कर्मचार्‍यांना निलंबीत करा

एसटी कामगारांची एकजुट; धुळे आगारात निदर्शने; रक्तदान करून सामाजिक बांधिलकी
आता सर्व कर्मचार्‍यांना निलंबीत करा

धुळे Dhule। प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे (State Transport Corporation) राज्य शासनात (state government) विलीनीकरण (Merger into) करून शासन नियमाप्रमाणे सर्व सोयी, सवलती, वेतन भत्ते लागून करावे, या मागणीसाठी (demand) एसटी कर्मचार्‍यांचा (ST employees) गेल्या पाच दिवसांपासून संप सुरू (strike continues)आहे. त्यात काल धुळे आगारातील काही कामगारांवर निलंबनाची कारवाई (Suspension action) करण्यात आली. त्यामुळे आज मलाही निलंबीत करा, असे फलक धरून कामगारांनी निदर्शने (Protests by workers) केली. निलंबीत कर्मचार्‍यांवर अन्यायाची भावना निर्माण झाली असून आता सर्व कर्मचार्‍यांना निलंबीत करावे, अशी मागणी केली आहे. तसे निवेदन (Statement) विभाग नियंत्रकांना (Department Controller) निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, संपात धुळे आगारातील चालक, वाहक, मेकेनिक, लिपिक, कामगार सहभागी असून आपल्या व्दारे केवळ पाच कामगार या आंदोलनात सहभागी असल्याचे भासवून त्यांचे निलंबन केल्याने त्यांच्यावर अन्याय करण्यात आला आहे. तरी रा.प. धुळे आगारातील सर्व कामगारांचेही निलंबन करण्यात यावे.

आमचे निलंबन न केल्यास सदर निलंबित कामगारांवर अन्याय झाल्याची भावना निर्माण होवून त्यांची मानसिकता खराब होईल. त्यांनी आपल्या जीविताचे काही बरे वाईट केल्यास घटनेस प्रशासन जबाबदार राहील. तरी संपाच्या आंदोलनात सहभागी असणार्या सर्वाचे निलंबन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर ज्ञानदेव महाले, व्ही. एस. सोनवणे, राजेंद्र मोरे, शंकर सगरे, उत्तमसिंह राजपूत, राजेंद्र लक्ष्मण जाधव, एम. पी. खांदरकर, एस. पी. खेडकर, जे. डी. गवळी, पी. बी. पवार, जे. आर. लष्कर, ई. बी. बुवा, पी. पी. पाटील, बटू पाटील, एस. बी. गवळी, के. सी. जाधव, पी. आर. सोनार, पी. एम. शिंदे, एस. एन. पाटील, ए. एस. पाटील, जी. एल. महाजन, पी. आर. पाटील, आर. एम. देसले, एस. डी. शिंदे, बी. एस. बोथनीस, एस. एस. शिंदे, एच. आर. रायगुडे, पी. सी. परदेशी, पी. एम. मराठे, आर. झेड. पारधी, आर. डी. सोनवणे, एम. जे. नाईक आदी चालक, वाहक, सहाय्यकांच्या स्वाक्षर्‍या आहेत.रक्तदान करून सामाजिक बांधिलकी

एसटी कर्मचार्‍यांच्या संपाचा आज सहावा दिवस असून कर्मचार्‍यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. त्यात संपकरी कर्मचार्‍यांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले. विवेकानंद प्रतिष्ठाणच्या पुढाकाराने व जिवनज्योती ब्लड बँकेच्या सहकार्याने हे रक्तदान शिबीर घेण्यात आले.

अभाविपचा पाठिंबा

महाराष्ट्राची प्रवासी व सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लालपरी सहा दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. तर विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे एसटी कर्मचार्‍यांच्या योग्य त्या मागण्या ग्राह्य धरून लवकरात लवकर संपाबाबत तोडगा काढावा. अन्यथा अभाविप एसटी कर्मचार्‍यांच्या खांद्याला खांदा लावून आंदोलन करेल, असा इशाराही अशी मागणी अभाविपने दिला आहे. तसे निवेदन राज्यपाल, मुख्यमंत्री, परिवहन मंत्र्यांना देण्यात आले आहे. यावेळी अभाविपचे धुळे आगारात संपाच्या ठिकाणी भेट देत रक्तदानही केले. यावेळी शहर मंत्री भावेश भदाने, सहमंत्री आदिती कुलकर्णी, चेतन अहिरराव, सुरज वाघ, निखिल हरले, ओमकार मोरे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com