बस-ट्रकचा भीषण अपघात, 1 ठार, 29 प्रवासी जखमी

जैताणे शिवारातील घटना, वाहनांचा चक्काचूर, प्रवाशांना बाहेर काढणे झाले कठीण
बस-ट्रकचा भीषण अपघात, 1 ठार, 29 प्रवासी जखमी

निजामपूर - Nijampur - वार्ताहर :

साक्री तालुक्यातील माळमाथा भागातील जैताणे गाव शिवारात भरधाव बस-ट्रकच्या भिषण अपघातात महिला जागीच ठार झाली.

तर 29 प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडला. अपघाताची निजामपूर पोलिसात नोंद झाली आहे.

पिंपळगाव (जि. नाशिक) आगाराची बस (क्र. एमएच क्र. बीटी 3752) नाशिकहुन नंदुरबारकडे जात होती. तर ट्रक (क्र. एमएच 18 बीजी 8971)नंदुरबारहुन साक्रीकडे जात असतांना जैताणे गावात शिवारात समोरासमोर दोन्ही वाहनांची धडक झाली.

अपघातात दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा चक्काचुर झाला होता. अपघाताचा मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक मदतीला धावून आले. तर माहिती मिळताच निजामपूर पोलस ठाण्याचे सपोनि सिचन शिरसाठ हे कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले.

अपघातात 29 प्रवासी जखमी झाले. तर विठाबाई प्रकाश बावा (वय 50 रा. घोटाणे) ही महिला ठार झाली. बस चालकासह काही जखमी बसमध्ये अडकले होते. त्यामुळे त्यांना बाहेर काढणे कठीण जात होते.

सर्व जखमींना बाहेर काढून जैताणे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून 22 जखमींना पुढील उपचाराठी नंदुरबारला तर एकाला धुळे येथे पाठविण्यात आले. तर सहा जणांना घरी सोडण्यात आले. दरम्यान एसटी विभागाच्या अधिकार्‍यांनीही घटनास्थळी भेट देवून जखमींची विचारपुस करत त्यांना आर्थिक मदत केली.

जखमींमध्ये मच्छिंद्र कराडे (वय 35 रा. जळगाव), राजेंद्र भाईदास गोसावी (वय 35 रा.घोटाणे), मंडाला गोसावी (वय 48 रा घोटाणे), सोनाबाई अशोक भदाणे (वय 50), सरलाबाई भदाणे (वय 40 रा. जेबापूर), मुमताजबी तैय्यम बेग (वय 55 रा. निजामपूर), सायली प्रमोद जोशी (वय 18), आशा चिमण जगताप (वय 1 वर्ष), अश्विनी चिमण जगताप (वय 30 रा. नंदुरबार), महेश देविदास पारधी (वय 38 रा. म्हसावद), आजिवबाई शालीकराव पाटील (34 रा. आनंदखेडे), मंगलबाई बारकु पाटील (वय 50 रा. धरणगाव), भिला डोंगर देसले (वय 65 रा. देऊरखुर्द), सविता वना वसावे (वय 15 मौलगी), जात्र्या धन्या तडवी (वय 20 मौलगी बोरकुंड), निर्मल कांगडा वसावे (वय 29 रा. मोलगी), प्रकाश भाईदास मावा (वय 7 रा. घोटाणे) , विलास बहिरम (वय 45 रा. पिंपळनेर), काशिराम मोटीराम जुंगळे (वय 45 रा. कळवण), कुणाल राकेश पाटील (वय 4 रा. कलमाडी), योगिता योगेश अहिरे ( वय 31 रा.पिंपळगाव), सुजाता शाम काळे (वय 30 रा. घोटी), हिराबाई भिकन देसले (वय 55 रा. देऊर), तय्यबबग युसूफबेग मिर्झा (वय 60 रा. निजामपूर), शाम रामदास काळे (वय 40 रा. घोटाणे), महेश देविदास परदेशी (वय 45 म्हसावद), चेतन यशंवत बागुल (वय 20 रा. मालेगाव) यांचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com