धुळ्याच्या प्रशिक्षण केंद्रातून जळगावचा नवप्रविष्ट पोलिस शिपाई पळाला

धुळ्याच्या प्रशिक्षण केंद्रातून  जळगावचा नवप्रविष्ट
पोलिस शिपाई पळाला
USER

धुळे । Dhule । प्रतिनिधी

शहरातील पोलिस प्रशिक्षण केंद्र (Police Training Center) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहे. त्यात 68 पोलिस कर्मचार्‍यांवर ( police personnel) अन्नातून झालेली विषबाधा (Poisoning) तसेच गेल्या पंधरा दिवसात दोन नवप्रविष्ट कर्मचारी (New recruits) मद्यधुंद अवस्थेत आढळून आले. त्यांच्यावर शहर पोलिसात गुन्हा (crime) दाखल आहे. त्यात काल दुपारी एक नवप्रविष्ट पोलिस कर्मचारी (New recruits) कोणास काही न सांगता पळुन गेला (Ran away). याबाबत शहर पोलिसात मिसिंगची (Missing) नोंद झाली आहे.

किरण संजय चौधरी (Kiran Sanjay Chaudhary) (रा. प्लॉट नं. 27 गट नं. 99/3, दादावाडी, कल्याणी नगर, जळगाव) असे त्याचे नाव आहे. याबाबत राखीव पोलिस निरीक्षक चंद्रकांत चौधरी यांनी शहर पोलिसात मिसिंगची (Missing) खबर दिली आहे. त्यानुसार दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास किरण चौधरी हा प्रशिक्षण केेंद्रात (Police Training Center) कोणास काही न सांगता मेन गेटमधून पळुन गेला. त्याचा प्रशिक्षण केंद्रातील अधिकारी व अंमलदारांनी परिसरात व शहरात ठिकठिकाणी शोध घेतला परंतू तो मिळून आला नाही. पुढील तपास पोहेकाँ सोनार करीत आहेत.

Related Stories

No stories found.