श्रीकृष्ण प्रणामी मंदिरात नवीन सिहासन अनावरण

108 दिव्यांची महाआरती
श्रीकृष्ण प्रणामी मंदिरात नवीन सिहासन अनावरण

सोनगीर/प्रतिनिधी Songir

सोनगीर (Songir) ही संतांच्या पद पदस्पर्शाने पावन झालेली महानभूमी आहे. या महान भूमीत आज श्रीकृष्ण प्रणामी मंदिरात नवीन सिहासन अनावरण सोहळा व 11 तारतम सागर साप्ताहिक पारायणाची पूर्णाहुती माझ्या कलकमलाने संपन्न होत आहे, हे मी माझे भाग्य समजतो, असे प्रतिपादन आचार्य श्री श्री 108 सूर्यनारायणदास महाराज यांनी केले.

प्राचीन श्रीकृष्ण प्रणामी मंदिरात (Shrikrishna Pranami Temple) नवीन सिहासन अनावर तसेच 108 दिव्यांची महाआरती व 11 तारतम सागर पारायण महोत्सवाची पूर्णाहुती श्री 5 महा मंगल पुरी धामचे गादीपती आचार्य जगतगुरु श्री श्री 108 सूर्यनारायणदासज महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तपोभूमी धामचे पुजारी संत श्रीपाल महाराज, श्री 5 महामंगल पुरी धाम सुरत येथील संत विश्वमोहन शास्त्री, सुनील कासार उपस्थित होते.

येथील श्रीकृष्ण प्रणामी मंदिर सोनगीर येथे चौथा वार्षिक महोत्सव कार्यक्रमानिमित्त श्री तारतम सागर 11 पारायण महोत्सवाचे साप्ताहिक आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 6 वाजता पुजारी जगदीश कासार , संजय कासार , प्रशांत तांबट व समाधी स्थळाचे पूजन ट्रस्टचे सचिव अनिल कासार (Anil Kasar) व सौ.रुपाली कासार यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आली.

11तारतम सागर पारायणाची आरती महोत्सव कार्यक्रमाचे संयोजक कैलास कासार व गोविंद कासार यांचा हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन तपोभूमी धाम ट्रस्टी पुजारी संत श्रीपाल महाराज, श्रीकृष्ण प्रणामी मंदिराचे पुजारी जगदीश कासार, मंदिर ट्रस्टचे सचिव अनिल कासार, उपाध्यक्ष राजेंद्र तांबट, खजिनदार उदय कासार, शामकांत कासार, अविनाश कासार, शाम कासार, गोविंद कासार, सुरेश कासार, अशोक कासार ,शिरीष कासार आदींनी केले आहे.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी शोभा कासार, भाग्यश्री कासार, रुपाली कासार, शशी कासार, यामिनी कासार, मीनाक्षी कासार, शशिकला कासार, राजबाला कासार, मिराबाई कासार, कुंदा कासार, रमण कासार, शिरीष कासार, दुर्गेश कासार अभय कासार, सुनील कासार, नयन कासार, कासार, धनंजय कासार, चिरायू कासार आदी प्रयत्न करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com