नेटबॉल खेळाडूंनी मैदानात साजरा केला दीपोत्सव

नेटबॉल खेळाडूंनी मैदानात साजरा केला दीपोत्सव

धुळे Dhule। प्रतिनिधी

दीपावलीनिमीत्त (Diwali) शहरातील मोहाडी उपनगरातील पिंपळादेवी विद्यालयाच्या (Pimpaladevi Vidyalaya) नेटबॉल मैदानावर (netball field) खेळाडूंनी (Players) पाचशे पन्नास पणती दिवे (Panati lamps) लावून दीपोत्सव साजरा (Celebrate) केला.

संपुर्ण मैदान प्रकाशमय करुन दीपोत्सव साजरा केला. आकाश विनायक शिंदे, महानगर खो-खो असोसिएशनचे सहसचिव तथा सुवर्णपदक प्राप्त खेळाडू अविनाश वाघ, धुळे जिल्हा हौशी नेटबॉल असोसिएशनचे सचिव योगेश वाघ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मैदानाचे पुजन करण्यात आले.

यावेळी सौ.वैशाली पांचाळ, सौ.शीतल भालेराव, नितीन सुर्यवंशी, मनिष निकम, राष्ट्रीय व राज्य खेळाडू ऋत्विक ठाकूर, हर्षल भदाणे, अभिषेक शिंदे, द्वारकाधिश माळे, हर्षदा पाटील, गितांजली खैरनार, साक्षी पाटील आदी उपस्थित होते.

दीपोत्सवाचे नियोजन हौशी नेटबॉल खेळाडू राहूल खैरनार, सिध्देश्वर पाटील, भविष्य वाघ, रोशनी सुर्यवंशी रोशनी केदार आदिंनी केले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com