राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस तथा पक्ष निरीक्षक अर्जुन टिळे यांनी स्वकियांनाच दिला हा इशारा....

राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस तथा पक्ष निरीक्षक अर्जुन टिळे यांनी स्वकियांनाच दिला हा इशारा....

धुळे Dhule । प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress is strong) संघटन (organization) मजबुत (strong) होत असतांना धुळे जिल्ह्यात मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार (MLA) नाही. त्यामुळे आगामी काळात आपल्याला आमदार निवडून आणण्यासह जास्तीत जास्त नगरसेवक (electing a corporator) निवडून आणायचे आहेत. तसेच जिल्हा परिषद (ZP) व पंचायत समित्यांवर (Panchayat Committees) राष्ट्रवादीचा झेंडा फडकवायचा आहे. त्यामुळे पक्षात गटबाजीला (Factionalism) व छुप्या युतीला अजिबात थारा दिला जाणार नाही. सर्वांनी एकनिष्ठ राहुन जिल्ह्यात पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी आतापासूनच कामाला लागावे, अशा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस (State General Secretary of NCP) तथा पक्ष निरीक्षक अर्जुन टिळे (Arjun Tille) यांनी पदाधिकार्‍यांना दिल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) धुळे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी नविन जिल्हाध्यक्षांची निवड करण्यासाठी आज सकाळी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात पक्ष निरीक्षक अर्जुन टिळे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. बैठकीला शहर जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, सुनील नेरकर, किरण पाटील, किरण शिंदे, एन. सी. पाटील, सत्यजित सिसोदे यांच्यासह साक्री, शिरपूर, दोंडाईचा, शिंदखेडा आदी ठिकाणाहून पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी अर्जुन टिळे म्हणाले की, नवीन जिल्हाध्यक्ष निवडीसाठी ही बैठक बोलवली असून जो जिल्हाध्यक्ष होईल, त्याच्यावर जिल्ह्यात पक्षाची बांधणी (Party building) करण्याची महत्वाची जबाबदारी असेल. जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी सर्वांनी पक्षाशी एकनिष्ट रहावे कोणीही विरुध्द काम करत असेल तर जिल्हाध्यक्षांनी त्याच्यावर कार्यवाही करावी. सर्वांची मते विचारात घेवून जिल्हाध्यक्षांची (Election of District President) निवड केली जाईल. त्यासाठी सर्वांनी एकत्र बसून एक नाव दिले तर त्या नावावर शिक्कामोर्तब केले जाईल अथवा अधिक इच्छुक असल्यास सर्वांचे ऐकून घेऊन मुलाखती घेवून तो अहवाल मी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर करेल.

त्यानंतर त्यांनी घेतलेला निर्णय जाहीर केला जाईल. जिल्ह्यात आमदार व नगरसेवक निवडून आण्यासह जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवायचा आहे. त्यादृष्टीने पक्ष संघटन मजबुत करण्यावर सर्वांनी भर द्यावा. त्यासाठी बुथ रचना करावयाची असून प्रत्येक गावात शाखा आणि प्रत्येक गावात संपर्क अभियान राबवायचे आहे. त्यादृष्टीने आतापासून कामाला लागावे. गटबाजीला (factionalism) अजिबात थारा दिला जाणार नाही. पक्षाशी बेईमानी खपवून घेणार नाही, अशा सूचनाही त्यांनी पदाधिकार्‍यांना दिल्या.

Related Stories

No stories found.