रस्त्यांसाठी राष्ट्रवादीचे ‘जवाब दो’ आंदोलन

रस्त्यांसाठी राष्ट्रवादीचे ‘जवाब दो’ आंदोलन

धुळे । Dhule प्रतिनिधी

शहरातील रस्त्यांसाठी (roads) शासनाने (Government's) सुवर्णजयंती योजनेंतर्गत (Golden Jubilee Scheme) 100 कोटी रुपयांचा निधी (Funding) दिला होता. हा निधी मिळूनही प्रत्यक्षात कामे होत नसल्याने (works are not happening)आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (NCP) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (Public Works Department) अधीक्षक अभियंत्यांच्या (Superintendent)दालनात ठिय्या आंदोलन (Sit-in agitation) करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी अधिकार्‍यांवर प्रश्नांचा भडिमार करून त्यांना जबाब दो असे सांगत निषेध व्यक्त केला.

सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शहरातील रस्त्यांसाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत जाहीर केला होता. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, महापालिका आयुक्त उपस्थित होते. हा निधी वितरित झाला असून दोन महिन्यांत कामे करण्याची सूचना करण्यात आली होती. ही कामे होत नसल्याने ठेकेदाराला जाब विचारणे गरजेचे आहे. मात्र, तशी कार्यवाही होत नसल्याने आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, राजेंद्र चौधरी, दीपक देसले, जितेंद्र पाटील, हाजी हाशिम कुरेशी, अस्लम खाटीक, कुलदीपक देवरे, सोनू घारू, महेंद्र शिरसाठ, राजेंद्र डोमाडे, मंगेश जगताप, राकेश गोयर, संजय सरक, सचिन देवरे, स्वप्नील पाटील, कृष्णा गवळी, अमित शेख, बंटी वाघ आदी सहभागी झाले होते.

Related Stories

No stories found.