राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज धुळ्यात

 शरद पवार
शरद पवार

धुळे ।Dhule । प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP leader Sharad Pawar) हे दि.30 रोजी धुळ्यात येत आहेत. राष्ट्रवादी भवनाच्या (Nationalist Bhavan) नूतणीकरणाचे (Inauguration of Renovation) उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल. याचवेळी ते उपस्थितांना संबोधितही करतील.

 शरद पवार
नंदुरबारकरांसाठी गुड न्यूज : सोमवारपासून मिळणार एक दिवसाआड पाणी

दि.30 जुलै रोजी सकाळी 8.30 वाजता नाशिकहून ते धुळ्याकडे येण्यास निघतील. 11.30 वाजता धुळ्यातील चाळीसगाव चौफुलीवर आगमन होईल. तेथून मिरवणुकीने शिवतिर्थ मार्गे राष्ट्रवादी भवनकडे जातील.

दुपारी 12.15 ते 1.30 वाजेच्या दरम्यान राष्ट्रवादी भवनाच्या नूतनीकरणाचा कार्यक्रम श्री.पवार यांच्या हस्ते होईल, असे माजी आ.अनिल गोटे यांनी कळविले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com