नांदेडचे पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांचा दोंडाईचात सन्मान

नांदेडचे पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांचा दोंडाईचात सन्मान

दोंडाईचा - श. प्र. Dondaicha

नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर (District Superintendent of Police Nandkumar Thakur) यांना पोलीस प्रशासनातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल (Presidential Medal) राष्ट्रपती पदक महाराष्ट्राचे महामहीम (Governor Bhagat Singh Koshyari) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते नुकतेच प्रदान करण्यात आले.

नांदेडचे पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांचा दोंडाईचात सन्मान
धावत्या बसवर कोसळले झाड ; प्रवाशी जखमी

नंदकुमार ठाकुर हे महाराष्ट्र (mpsc) लोकसेवा आयोगाच्या १९९५ च्या बँचचे अधिकारी असुन त्यांनी याआधी उपअधिक्षक पदी जळगाव, नाशिक, मुंबई, ठाणे (Jalgaon, Nashik, Mumbai, Thane) इत्यादी ठिकाणी आपली सेवा उत्कृष्ट बजावुन नाशिक पोलीस प्रशिक्षण केंद्रात (Nashik Police Training Center) त्यांना पोलीस अधिक्षकपदी पदोन्नती प्राप्त झाली होती.

तसेच नुकतीच त्यांची नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली असुन आतापवेतोच्या उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे त्यांना नुकतेच राष्ट्रपती पदक महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यास्तव त्यांचा सहपत्नी सन्मान दोंडाईचा शहरात विविध सामाजिक संघटना तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांनी केला.

यात दोंडाईचा शहरातील स्व.मजुंळाबाई महाले कनिष्ठ महाविद्यालय व अनुसुचित जाती अनुसुचित जमातीच्या आश्रमशाळेत मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष तथा संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब हितेंद्र महाले, माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील, माजी बांधकाम सभापती संग्रामसिंह राजपुत, भाजपा शहराध्यक्ष प्रविण महाजन, माजी आरोग्य सभापती जितेंद्र गिरासे, माजी शिक्षण सभापती नरेंद्र कोळी, नगरसेविका भावना महाले, पत्रकार राजेश ईशी, जेष्ठ पत्रकार जे पी गिरासे, रणजीत राजपुत, नरेंद्र ठाकुर, समाधान ठाकरे, ठाकुर समाजाचे जिल्हाध्यक्ष केटी ठाकुर, घनश्याम राजपुत, अजय पाटील, अविनाश ठाकुर, संस्थेचे उपाध्यक्ष हेमंत महाले, प्राचार्य अरुण पाटील, मुख्याध्यापक नरेंद्र बोरसे, तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com