नगाव ग्रा.पं. आरक्षण सोडतबाबत तक्रार

अनुसूचित जाती प्रवर्गाचे चुकीच्या पध्दतीने आरक्षण, प्रभाग रचनेतही फेरफार, जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार
नगाव ग्रा.पं. आरक्षण सोडतबाबत तक्रार

धुळे । Dhule प्रतिनिधी

तालुक्यातील नगाव बु. (Nagaon Bu.) ग्राम पंचायतीच्या (Gram Panchayat) सार्वत्रिक निवडणूकीबाबत (general election) काढण्यात आलेले आरक्षण सोडत चुकीची (Wrong to leave reservation) असून अनुसूचित जमाती प्रवर्गावर अन्याय करण्यात आला आहे. त्याप्रमाणे प्रभाग रचनेतही फेरफार (Changes in ward structure) करुन काही व्यक्तींच्या मर्जीप्रमाणे बदल करण्यात आल्याची तक्रार (Complaint) करण्यात आली आहे.

नगाव येथील रहिवाशी तथा हरकतदार जगन्नाथ सुका बैसाणे यांनी जिल्हाधिकार्‍यांना लेखी स्वरुपात याबाबतच्या हरकती नोंदविल्या आहेत. त्यांनी नमूद केल्यानुसार, मुदत संपलेल्या ग्राम पंचायतीमध्ये नगावचा समावेश असून ऑक्टोबर, नोव्हेंबर दरम्यान सार्वत्रिक निवडणूक होवू घातली आहे. या अनुषंगाने नगाव ग्राम पंचायतीची विशेष ग्रामसभा 4 जून रोजी घेण्यात आली. मात्र ती तहकूब करण्यात आली. या सभेला आपण विरोध करुन हरकत घेतली आहे. मुळात नगाव गावातील वार्ड क्र. 1 मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाची लोकसंख्या विचारात घेता सन 1962 पासून हा वार्ड अनुसूचित जाती (एससी) साठी आरक्षीत राहिला आहे. मात्र नवीन रचनेत आरक्षण बदविण्यात आले आहे. वार्ड क्र. 6 मध्ये केवळ 49 एवढी लोकसंख्या असतांना चुकीच्या माहितीच्या आधारावर रचना करण्यात आली आहे. यासाठी अनुसूचि नमुना ब मध्ये दर्शविलेली माहिती चुकीची व दिशाभूल करणारी आहे. 1962 ते 2017 पर्यंत वार्ड क्र. 1 मधील आरक्षण हे अनुसूचित जात प्रभागासाठीच आरक्षीत राहिलेले आहे.

शासकीय अधिकारी, तहसीलदार, ग्रामसेवक, मंडल अधिकारी, तलाठी यांनी राजकीय दबावापोटी नियमबाह्य व बेकायदेशीर काम केले असून विशिष्ट व्यक्तींना लाभ होवून अशा पध्दतीची रचना व आरक्षण केल्याचा आरोप श्री. बैसाणे यांनी केला आहे. त्यांचे हे कृत्य ग्र्रामपंचायत अधिनियम 1958 चा तरतूदीचे भंग करणारे आहे. त्यामुळे वार्ड क्र. 1 मधील आरक्षण पुर्ववत करावे. नमुना ब चुकीचा असल्याने रद्द करण्यात यावा, संबंधित शासकीय अधिकार्‍यांवर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करुन त्यांना सेवेतून बडतर्फ करावे तसेच 4 जून रोजी न झालेल्या सभेचे प्रासिडींग मागवून तपासण्यात आले. म्हणजेच अनुसूचित जाती प्रवर्गावरील झालेला अन्याय दूर करवा अन्यथा न्यायालयाकडे दाद मागावी लागेल, असेही श्री. बैसाणे यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या प्रकार वजा हरकतीत नमूद केले आहे.

प्रभाग रचनेतही फेरफार-नगाव ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेत फेरफार झाल्याची श्री. बैसाणे यांनी केली आहे. तसेच या गृप ग्रामपंचायतीत नगावमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गाचे 225, चिंचगाव ढंडाणे, वडेल, रामनगर 322 मतदार आहेत. त्यांना दोन जागा आणि नगावमध्ये एसटी प्रवर्गाच्या दोन जागा अशी रचना करुन विषमतावादी तत्व अवलंबिले आहे. नगावमधील वार्ड क्रमांक 1 मध्ये एकूण 17 मतदार असून पैकी सुमारे 950 ते 1000 मतदार अनुसूचित जाती प्रवर्गाचे आहेत. तर 778 मतदार अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आहेत. तरीही एससी प्रवर्गाला एक जागा आणि एसटी प्रवर्गाला चार जागा देण्याचे षडयंत्र अवलंबिण्यात आल्याचे श्री. बैसाणे यांनी म्हटले आहे.

एकाच कुुटुंबातील व्यक्तींना वेगवेगळ्या वार्डमधील रहिवासी दाखविण्यात आले आहे. चुकीच्या पद्धतीने आरक्षण आणि रचना केल्यामुळे अयोग्य लोकप्रतिनिधी निवडून जावून सत्ता उपभोगतात असेही तक्रारदारांचे म्हणणे आहे. या ग्रामपंचायतीत झालेल्या गैरप्रकाराबाबत जुन्या याद्या आणि रचना यांचे आवलोकन केल्यास ही बाब निदर्शनास येवू शकते. त्यामुळे तटस्थ समितीमार्फत चौकशी करुन या ठिकाणी झालेले गैरप्रकार दूर करावे अशी मागणीही श्री. बैसाणे यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com